माझी भ्रमंती / एक स्वप्न


माझं एक स्वप्न आहे. स्वप्न म्हणजे एक वेडी इच्छा आहे, ती अशी कि मला आपल्या भारतात ज्या ज्या मोठ मोठ्या नद्या आहेत न, ज्यांना आपल्या इतिहासात फार मोठ स्थान आहे, ज्यांना फार पवित्र समजलं जातं. अश्या सर्व नद्यांमध्ये मला आंघोळ करायची आहे. काही थोड्या अंशी मी हे केल पण आहे. म्हणजे काही मोठ्या नद्या ज्यांमध्ये मी आज पर्यंत अंघोळ केली त्या म्हणजे..

१. गोदावरी (नाशिक) 
२. नर्मदा (गुजरात)
३. कावेरी (कर्नाटक)
४. यमुना(उत्तर प्रदेश)
५. शिप्रा (उज्जैन, मध्य प्रदेश) 
६. भीमा/चंद्रभागा (पुणे)
७. इंद्रायणी (पुणे)
८. तापी (जळगाव, महाराष्ट्र )            
९. कुंडलिनी (रोहा, महाराष्ट्र)

आणखी बऱ्याच बाकी आहेत, म्हणून चालू आहे हळू ह्ळू. मला न असा डोंगर दऱ्या, ऐतिहासिक जागा किव्वा मोठ मोठी देवस्थाने बघायला खूप आवडतं. आपल्या भारतात नुसता खजिना आहे ह्या गोष्टींचा. ज्याला कळला तो त्याचा झाला, तो मनसोक्त आनंद घेऊ शकतो त्यांचा. मला पण तो आनंद घ्यायचा आहे आणि हो तुम्हालाहि काही तोडक्या मोडक्या शब्दात इथे वाटण्याचा प्रयत्न करीन.       

  

1 comment:

  1. Amol apan ganga madhe pan anghol keleli aahe. :) tichaa ullekh nahi kelas.. :)

    ReplyDelete