परिचय...नमस्कार मित्रांनो.

परिचय...मी काय परिचय करून देऊ माझा. एमबीए मध्ये इतके इंटरव्युव दिले. प्रत्तेक एचआर पहिला प्रश्न हाच विचारतो कि  """tell me something  about yourself ". उत्तर घोकल्या सारखं आम्ही सुरु व्हायचो. १ मिनिटात काय काय सांगणार हो, मला तर सगळ्यात अवघड काम वाटतं ते. म्हणून तर ह्या माझ्या ब्लॉगच नाव "परिचित" असं ठेवलंय. "परिचित" म्हणजे परिचय करून द्यायची गरजच नाही. तुमच्याशी दिल खुलासपणे गप्पा मारण्यासाठी आणि मनातले मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे लिहिण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा करतो. मी अवघड अश्या गोष्टींवर अजिबात लिहिणार नाही, कारण त्यासाठी आपला आयुष्य आहेच कि. लहानसे दैनंदिन जीवनातले अनुभव शब्दात ओवण्याचा प्रयत्न करेन, कदाचित ते तुमच्या पण आयुष्यात तुम्हाला अनुभवाला येत असतील. तुम्हीही परिचित आहात त्यांच्याशी. मग, आता काही वेगळी गोष्ट उरलीच नाही आपल्यात. झालो न आपण परिचित. बस आता फक्त भेटत रहा. बाकी काही नको.


         

2 comments:

  1. lekhan awadale...krupaya email address dyava...

    ReplyDelete
  2. Hey Akshay...Dhanyavaad...my mail ID is amolbpawar@gmail.com...

    ReplyDelete