सांधण दरी (Sandhan
Valley)........ नुसता जीव जळायचा हो, जेव्हा जेव्हा गुगल किव्वा इतर मित्रांच्या
ब्लॉगवर ह्या दरीचे फोटो पहायचो. किती वेळ नुसते ते फोटो बघत बसायचो मी. कधी जायीन
कधी ती दरी बघेन असं व्हायला लागलं होतं.
असेच ब्लॉग वाचत असतांना दत्ता भांगरे याचा फोन नंबर भेटला (८६०५१५१६४१, ९३२५९२६३४१). लगेच त्याला फोन केला आणि सगळी माहिती घेतली. दत्ता हा साम्रद गावाचा रहिवाशी. सांधण दरी याच्या घरा पासून अगदी १०-१५ मिनिटाच्या अंतरावर. रतनगड, अलंग, मदन आणि कुलंग ई डोंगर हे देखील गावाच्या आजू बाजूच. तो म्हणाला कि खाण्याची, rappling करून खाली उतरवून द्यायची, परत गावात आणण्याची सगळी व्यवस्था करेन, प्रत्तेकी ६०० पर्यंत खर्च येयील. मेंबर वाढले तर पर हेड खर्च कमी होयील. पण पाऊस खूप आहे दरीकडे अजिबात जाता नाही येणार म्हणून आता नका येऊ असं पण म्हणाला. त्याने नोवेंबर मध्ये यायला सांगितलं. आता इतके दिवस वाट पाहिली, थोडे आणखी दिवस पाहू असं म्हणून तयारीला लागलो.
मित्रांना सागितलं, जमवाजमव सुरु झाली. सगळे हो म्हणाले आणि सगळ्यांच्या सोयीचा विकेंड शोधला. सांधण दरी विजय सोडून बहुतेक जणांना माहित नव्हती. त्यामुळे सगळेच फार आनंदी आणि उत्साही झाले. उत्साहाचं दुसर कारण होतं कि फार दिवसांनी असे सगळे निघणार होतो.
मग ते सगळे नाशिक वरून आणि मी पुण्या वरून येणार असं ठरलं, कारण नाशिकला जाऊन परत प्रवास नसता जमला मला (असं केलं असतं तर बर झालं असतं..असो.. सांगतो नंतर). तयारी झाली आणि शनिवार नक्की झाला. त्या शुक्रवारची रात्र फार मोठी वाटली, संपेचना हो. शेवटी माझी मीच पहाट केली :), तयार झालो, मित्रांना फोन केला, ते निघाल्याची खात्री केली, माझी Avenger काढली आणि निघालो. जवळ जवळ ५ वाजले होते. मी ज्या रस्त्याने जाणार होतो तो सांधण दरीकडे जाण्याचा खरा रस्ता नव्हता हे मला नंतर कळलं अगदी तिथे जवळ पोहोचल्यावर. मी पोहोचलो तिथे पण जरा उशिराने...असो. सविस्तर लिहितोच पुढे ह्या बद्दल. पण मित्रांनो एकच महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे कि कुठेही नव्या ठिकाणी जाण्या पाहिले जरा माहिती काढा आणि मगच निघा.
काही फोटो काढले आणि लागलो पुढच्या मार्गाला. गणेश खिंडीचा घाट पार करतांना चांगलीच कसरत झाली म्हणजे गाडी चांगलीच हळू चालवावी लागली. उतरलो घाट एकदाचा आणि लगेचच थोड्या पुढे एकदम झकास रस्ता लागला हो. वाह मग काय चांगलीच गाडी बुन्गवली. डाव्या बाजू हिरवा निसर्ग, उजव्या बाजूला धरण असा रस्ता होता. काही वेळात माळशेज घाट लागणार होता. आज पर्यंत कधीच योग आला नव्हता ह्या रस्त्याने जायचा. खूप ऐकलं होतं भरपूर लोकांकडून कि अगदी झकास घाट आहे म्हणून एकदा तरी जायलाच पाहिजे. आज योग आला होता आणि मी पुरेपूर आस्वाद घेण्यास सज्य होतो.
क्रमशः
No comments:
Post a Comment