मागच्या महिन्यात एक दोन ठिकाणी गेलो होतो फिरायला पण यार लिहिणं होतंच नव्हतं. थोडं थोडं लिहून सेव करून ठेवलं होतं. आज भेटला वेळ. असो... आता पुढे प्रमुख लिखाणाकडे.
किती दिवस झालेत 'बनेश्वर' ला जाऊ म्हणत होतो आणि मागच्या महिन्यात ती संधी चालूनच आली. बनेश्वर काही दूर नाही पुण्यापासून ५०-५५ किमी असेल. वातावरण छान, आल्हाददायक होतं, आणि स्वच्छ निळ आकाश. पुण्यातून चालतांना आजू बाजूला मोठ मोठ्या इमातरी ह्या तुमच्या साथीदार असतात पण पुणे सोडलं रे सोडलं तुमचे साथीदार बनतात ते मोठ मोठे डोंगर. जे खूप लांब पर्यंत तुमची साथ सोडत नाहीत. बनेश्वर ला जाण्याचा रस्ता अगदी सरळ म्हणजे सातारा हायवे ला लागायचं आणि नसरापूर फाट्यावरून उजवी कडे वळायचं. ३-४ किलोमीटर थोडं गावातून गेलं कि उजव्या बाजूला 'श्रीक्षेत्र बनेश्वर' ची कमान दिसेल. डाव्या बाजूला जो रस्ता जातो तो तुम्हाला 'राजगड' कडे घेऊन जायील, म्हणजे बनेश्वर पासून ३५-१ किमी असेल.
वाट कशी सरली काहीच कळलंच नाही आणि पोहोचताच जोरात पाऊस सुरु झाला. ह्या वर्षी किती पाऊस झाला ते तर सगळ्यांनाच माहित आहे. मग वाटलं परत ह्या ऋतूत असा चान्स नाही भेटणार, कारण परत हा पाऊस दिसतो न दिसतो घ्यावं भिजून. तसंच पोहोचलो मंदिराजवळ. चारही बाजूनी हिरव्या झाडांनी वेढलेलं होतं ते. तिथे पोहोचता पोहोचता 'बनेश्वर' नावाचा अर्थ समजू लागला, जाणवू लागला.

मंदिराच्या आत जायला निघालो. काही पायऱ्या खाली उतरलो कि समोर अवतरते ते अगदी पिवळ धमक शिव मंदिर, जसं काही ताज्या पिवळ्या हळदीचा लेप आताच दिलाय. हे मंदिर शिवगंगा ह्या नदीजवळ वसलेलं आहे. पेशव्यांच्या काळात सगळी बांधणी वगैरे झाली. पेशव्यांची अशी इच्छा होती कि शहरापासून जरा दूर पवित्र भगवद दर्शन आणि निसर्गाच्या सान्निध्यात शांतता पण लाभावी अशी एक जागा असावी. त्यातूनच मग हे बनेश्वर अवतरले. मंदिरा समोर दोन छोटे तळे होते, मोठ्या हौदा सारखे. त्यात मासे आणि कासव होते. त्यात असलेल्या पाण्याची व्यवस्था फारच विशिष्ठ होती, इतकं पाणी येत त्यात पण कुठे जाते ते कळणार नाही. आजू बाजूला काही छोटे छोटे मंदिर होते. मंदिरात गेलो दर्शन घेतलं. इथले शिवलिंग जरा वेगळे आहे असे म्हणतात. त्यात एका मोठ्या शिवलिंगात छोट्या छोट्या शिवलिंग आहेत. काही ठराविक वेळीच ते वरच शिवलिंग बाजूला करतात आणि आतल्या लिंगांची पूजा होते.
छान पैकी दर्शन झाले आणि मग निघालो मागच्या बाजूला जिथे धबधबा होता. झाडांमधून छान रस्ता बनवलेला होता नदीकडे जाण्यासाठी. त्या वाटेवर भरगच्च झाडे होती पण अतिशय सुरेख मांडणी केलेली. नियोजन खरच छान होतं. १०-१५ मिनिट चाललो आणि नदी किनाऱ्यावर येऊन पोहोचलो. भरपूर पाऊस पडून गेलेला दिसला म्हणून सगळी कडे चिखलच चिखल दिसत होता. नदी पात्रात जाण्यासाठी १५-२० फुट खाली उतरून जावं लागणार होतं. भरपूर लोक तिथे वरच उभे असलेले दिसले. कारण माझ्या समोरच २-३ जन खाली उतरतांना धपकले होते. कुणी हिम्मत करत नव्हतं. पण वाटलं कि इतक्या दूर आलो आहे आणि मग इथूनच परत जाणं मनाला न पटणारं होतं. केली हिम्मत कशी तरी हळू हळू, झाडांना पकडत उतरलो खाली. छोटासाच रस्ता होता हो तो फक्त चिखलामुळे जरा अवघड वाटत होता बाकी काही अवघड नव्हतं. असो. पोहोचलो एकदाचं नदीत.
मागच्या वेळी जेव्हा इथे आलो होतो, तेव्हा पाणी फारच कमी होतं, त्या मुळे पाण्यात पाय टाकून बसण्याची इच्छा पुरे पूर पूर्ण करून घेतली होती. आता पाणी फारच जास्त होतं हो, चांगलंच जोरात वाहत होतं ते. आता जर का हिम्मत केली तर एखाद्या तृणा सारख मला वाहत घेऊन गेला असता तो प्रवाह असे स्पष्ट संकेत होते. म्हणून वाहतं पाणी सोडून जो काही रिकामा खडक होता त्यावर उभा राहून निसर्गाचा आनंद घेऊ लागलो. फारच कमी लोक होते खाली बहुतेक वर सांगितलेल्या कारणामुळे. धबधबा तसा छोटासाच होता पण पाणी जास्त असल्याने त्याने आकार वाढवला होता. उजवी कडे बघितलं तर हि नदी जंगलातून रस्ता काढत येत असलेली दिसते. नदीच्या मार्गात खडक पण भरपूर होते, मधूनच ते नदीच्या पाण्यातून वर डोकावतांना दिसायचे आणि कधी कधी ते पाणी त्यांना परत पाण्यात बुडवून टाकायचे. मग हि नदी डावी कडे ह्या धबधब्या तून कोसळून पुढे मार्गक्रमण करत असतांना दिसते.
अप्रतिम निसर्गाचा आस्वाद घेत उभे होतो आम्ही. आणि त्यातल्या त्यात हा जोरात वाहत असणाऱ्या पाण्याचा आवाज. पाण्याचा खळ खळ आवाज किती मस्त वाटतो आपल्याला, भलेही तो आवाज छोटेखानी झऱ्याचा असो किव्वा उंचा वरून कोसळणाऱ्या धबधब्याचा. मन प्रसन्न होणार म्हणजे होणारच. आजू बाजूचा निसर्ग पण त्या धबधब्याच्या सुंदरतेत भर घालत होता. समोरच्या बाजूला, म्हणजे नदीच्या दुसऱ्या बाजूला छोटे छोटे डोंगर होते अगदी हिरवे गर्द. काय नजरा होता यार, दिल खुश. खूप वेळ गेला यात, म्हणजे हरवल्यावर वेळ कसा जातो ते जसं कळत नाही तसा वेळ गेला :) भारी भारी पोज मध्ये फोटो काढून घेतले आणि हि हिरवी आठवण मनात साठवून परतीच्या मार्गास लागलो.
खरच 'बनेश्वर' हे त्याच नाव सार्थक करून दाखवतं अगदी तुम्ही मंदिराच्या परिसरात आगमन करतात त्या क्षणा पासूनच. एक दिवसाच्या फिरस्ती साठी अगदी छान जागा आहे, पावसाळ्यात/ हिवाळ्यात एकदा तरी भेट द्यावी अशी.
Wow..................Its awesome yaar..........
ReplyDeletekharach Ankita...mast aahe jaga... jaun ye nakki :)
DeleteJay bhole shankar.........Har har mahadev.....Jayla paije ekda Baneshwarla.....
ReplyDeleteHo Uday..agadi javalach aahe...khupach greenary aahe... nakkich jaun ye.. :)
DeleteChotya shivlinganche darshan karun detat ka aplyala?
ReplyDeleteNaahi re Netra...agadi occasionaly kartaat asa te.. mhanaje mahashivaratri vagaire la.... ashich bhet det raha :)
Delete