Monday, April 23, 2012

'मिशन हरिश्चंद्र गड - 2'सुरुवात येथे वाचा 
भाग १ येथे वाचा

बराच वेळ झाल्या नंतर विजयला फोन लागला आणि त्याने ज्याची आपण आनंदी वातावरणात कल्पना करत नाही किव्वा असं आपल्या बरोबर होणारच नाही.... अशी घटना सांगितली ती म्हणजे "गाडी पंचर झाली आहे".(परफेक्ट प्लानिंग ना भो..!!!) बस...काय करावे ते कळेना. मग ते दोघे येई पर्यंत पुढचा रस्ता, आणि पंचरचं बघून ठेवलं. विजय लिफ्ट घेऊन आला आणि मला हरीला सपोर्ट करण्यातही जायला लावलं. मी थोडा पुढे गेलो न गेलो तेव्हड्यात हरी आला, पंचर झालेली गाडी चालवत. शोधून ठेवलेल्या पंचरच्या दुकानात नेली. तो दुकानवाला म्हणाला कि पूर्ण ट्यूब बदलावी लागेल. घ्या असं कसं? तिथे आम्हाला (म्हणजे मला ) समजलं कि जर तुम्हाला कळलं कि तुमची गाडी पंचर झाली आहे तर त्याचा वाल्व आत ढकलून द्यावा आणि मगच पुढे गाडी चालवत न्यावी. असं न केल्यास पूर्ण ट्यूब खराब होतो.आम्ही पंचर काढला (आमच्या परफेक्ट प्लानिंगची पण हवा हळू हळू निघत गेली) मग काय आता राजूर हे एव्हडच मोठ गाव होतं त्या एरियात पुढे काही नाष्टा पाणी मिळणार नाही असं नक्की होतं. मग गावात घुसलो. एका ठिकाणी गाडी थांबवणार तेव्हड्यात दुसऱ्या बाजूला विनोदला कोल्हापुरी मिसळ चा बोर्ड दिसला आणि तो " अरे तिकडे तिकडे तिकडे " असं ओरडला. तिथे गेलो मस्त मिसळ मारली. आमच्या अपेक्षे पेक्षा फारच छान होती मिसळ. मग गरम गरम चहा पिला आणि निघालो मग पुढे, पाचनई गावाच्या दिशेने. तिकडे जाताना लोकांनी आम्हाला पहिलेच सांगून ठेवलं होतं कि ५-६ फाटे लागतील, तिथे विचारूनच पुढे जा. (या वाक्याचं महत्व आम्हाला लवकरच कळलं). 

सुरवातीला रस्ता जरा मोठा होतापुढे तो बरयापैकी छोटा झाला. काही ठिकाणी अचानकपणे रस्ता व्ही शेप घ्यायचा तर कधी टी शेपम्हणजे कळतंच नव्हतं कि कुठे जायचं ते. योगायोगाने तिथे लोक भेटायचे म्हणून कळायचं कि कुठे कुठल्या दिशेला जायचं आहे ते. विनोद तर ह्या अनुमानावर पोहोचला होता कि प्रत्येक गावातल्या एका माणसाला तरी अश्या फाट्या न्वर गावाची माहिती देण्यासाठी उभ केलंच पाहिजे. त्यातल्यात्यात एका ठिकाणी एक झोकांड्या खात चाललेला दारुड्या भेटलाआजूबाजूला कुणी दुसरा व्यक्ती नव्हता म्हणून नायिलाजाने त्याला विचारावं लागलं कि पाचनई गाव/ गडाचा रस्ता कोणता. नवल म्हणजे त्याने क्षणाचाहि विलंब  करता एका दिशेला हात केला. आयला...विनोदला पडला प्रश्न कि ह्याने नक्की कुठला रस्ता दाखवलागडाचा कि दारूच्या दुकानाचा???? दुसरं ऑप्शन नसल्याने गेलो त्या रस्त्याने पुढे. थोडा वेळ वाटलं कि म्हाताऱ्याने दारूच्या नशेत आम्हाला 'मार्गीलावलं कि काय. पण नाही हो...बरोबर रस्ता सांगितला त्याने. असो.


मी पहिल्यांदाचअश्या 'छान' रस्त्यावर गाडी चालवत होतो. भयंकर वळणावळणाचा. खडी चढायीचा आणि त्याच   वेळी तीव्र उतार असलेला. कित्तेक चढायीवर पहिल्याच गियरवर गाडी चालवावीलागलीत्या शिवाय गाडी पुढे जायीच ना. दूसरा गियर टाकला रे टाकला...गाडी जीवच सोडून द्यायचीजसं जमेल मग तसं खेचत होतो तिला कारण मोठ्या द-या  खोरयातून चाललो होतो. जवळ पास एक तास  अश्या रस्त्यावरून गाडी चालवत होतो जिथे नजर 
ह्टी आणि दुर्घटना घटी अशी परिस्थिती यायला वेळ लागला नसता. तिथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला नुसती मस्त करवंदाची झाडेच झाडे दिसत होती. अजून कच्चीच होती  महिन्यात पिकतील असं विजयहरी म्हणाले.  एव्हाना त्या रस्त्यावरून जातांना आम्हाला अंदाज येऊन चुकला होता कि जी खेडी, गाव, आम्ही क्रॉस करत चाललो होतो ते पण आता दिसे नसे झाले होते. आता कुठे तरी मधेच एखादी वाडी दिसत होती . जरा दूर दराज के इलाके मे पहुंच गये है अशी खात्री झाली. आजूबाजूला जिकडे नजर जायील तिकडे ह्याद्रीच दिसत होता. अगदी लायनीत लांब पर्यंत पसरलेला. छोटे. मोठे सगळ्या प्रकारचे. खरच सरळ सरळ त्यांच्या कडे पाहून आपल्याला अंदाज येत नाही कि कित्तेक गड किल्ले ह्याच्यात समाविष्ट आहेत. ज्यांनी त्यांना बनवले आणि नन्तर ज्यांनी ते शोधले त्या सगळ्यांना अतिशय मनापासून नमस्कार.

 अतिशय आत मध्ये जात होतो (शहरांपासून दूर). कधी कधी खड्ड्यांना चुकवत, तोल सांभाळत आणि एका पेक्षा एक निर्सर्गाचे दृश्य पाहतशेवटी पोहोचलो 'पाचनई' गावात. शहरात रस्त्याला खड्डे पडले तर आपण ओरडत असतो पण इथे खड्डया खड्डया मध्ये डांबर दिसत होतं तरी आम्हाला हायसं वाटत होतं कि बर झालं यार कसाही असो पण रस्ता आहे. असो.. 'पाचनई गाव' इथून गडावर जाणारा एकंच रस्ता आमचा ऑप्शन होता. कारण दुसरे रस्ते आमच्या सोयीचे नव्हते ते गडाच्या मागच्या बाजूने होते. मुंबईकर आणि पुणेकर जास्त करून ह्या रस्त्याचा उपयोग करतात. टोलार्खीन्डीचा रस्ता, जुन्नर दरवाजा, नळीची वाट हे काही मार्ग आहेत वर जाण्याचे. नळीची वाट- जे लोक इथून येतात त्यांना हजार सलाम कारण तिथन रॉक क्लायीम्बिंग करावी लागते आणि फारच अवघड असा आहे तो. हेच लोक खऱ्या सह्याद्रीचा अनुभव घेतात असा मला मनापासून वाटतं. त्यांच्या मानाने आम्ही फारच सोप्या रस्त्याने जाणार होतो.


तर मग 'पाचनई' गावात पोहोचायला आम्हाला जवळ पास १०.३० वाजले होते. ह्या वेळे पर्यंत वर पोहोचायचा माझा प्लानिंग होता पण काय करणार परफेक्ट प्लानिंग...असो. तिथे खाली असलेल्या हॉटेल मध्ये गाड्या लावल्या, थोडी फार माहिती घेतली आणि निघालो गडाच्या दिशेने. संध्याकाळी परतीचा प्रवास करायचाच होता म्हणून वर जरा आवरतं घ्यावं लागणार असा अंदाज आम्हाला येऊन चुकला. आता वेळ घालवण्यात अर्थ नव्हता म्हणून लागलो रस्त्याला. चढायीच्या सुरुवातीला थोडीफार माहिती असलेले हे बोर्ड दिसले. बोर्ड वाचून पुढे निघालो. 

उन भरपूर वाढलं होतं म्हणून सुरुवातीच्या पहिल्या २०-२५ मिनिटात चांगलीच वाट लागली आमची. रस्ता अवघड नव्हता पण चढायीचा होता म्हणून दमछाक झाली. बर झालं इतक्या उन्हात सुद्धा मधेच दाट अशी झाडी लागायची त्या वाटेवर, २ मिनिट त्या सावलीत बसलं तरी शांत वाटायचं. वाटेवर दुतर्फा बहुतेक करून करवंदाची झाडे होती.

विजय, हरीशने तोडली काही, एकदम हिरव्या रंगाची आणि कच्चीच होती ती पण यार टेस्ट अगदी करवंदा सारखीच. झाडावरून फळ तोडून खाण्याची मजा काही औरच. शहरात आता हि गोष्ट दुर्मिळच होत चालली आहे. इथे आम्हाला तो आनंद छोट्या प्रमाणात का होयीना लुटता आला. विजय आणि हरीने जरा जास्तच लुटला..असो. सुरुवातीला दाट अशी झाडी लागली म्हणजे ठराविक अंतरापेक्षा तुम्ही दूर पाहूच नाही शकणार इतकी दाट. पुढे काही ठिकाणी छोटी दगडी चढाई लागली, इतकी काही अवघड नव्हती ती. अशी मजा लुटत वरचा प्रवास चालू होता आमचा. खाली असतांना समोर असलेल्या डोंगरा मागचं तुम्हाला काहीच दिसत नाही पण जस जसं तुम्ही वर चढत जातात तस तसं तुमची नजर आणखी दूर पोहोचते. म्हणजे त्या डोंगरा पलीकडच जग तुम्हाला दिसायला लागत. मागून हळूच एक एक डोंगर डोकवायला लागतो. प्रथमदर्शी छोटी टेकडी म्हणून भास होतो पण मग आणखी वर चढल्यावर त्याची भव्यता दिसते. अगदी अप्रतिम असे दृश्य दिसायला लागतात . तिथे आम्हाला सरळ रेषेत उभा असलेला सह्याद्री दिसायला लागला आणि त्याच्या आजुबाजू असलेलं हिरवगार जंगल. वेळ कसा जात होता कळतच नव्हतं.


एका तासात बऱ्यापैकी वर चढून गेलो. आता आमच्या डाव्या बाजूला मोठ्या काळ्या खडकाचा डोंगर होता आणि उजव्या बाजूला खोल दरी. प्रचंड मोठा काळा दगड होता तो. त्या डोंगराची सावली दूर पर्यंत पसरली होती म्हणून त्यातून चालतांना छान वाटत होतं. पुढे एका मोठ्या वळणावर त्या डोंगराने आपलं विशाल रूप दाखवूनच दिलं. म्हणजे समोर तो अगदी ९० अंश्याच्या कोनात उभा होता. वर पर्यंत नजरच पोहोचेना हो. निसर्गाचं अतिशय भव्य असं रूप होतं ते. आपण याच्या समोर काय आहोत? कोण एक किडा मुंगी ? असा प्रश्न मनात आल्या शिवाय राहणारच नाही. विजय त्या कड्याकडे बघत होता. बहुतेक तो हाच विचार करत असावा आणि त्याच वेळी मी त्याचा फोटो टिपला.
क्रमशः
पुढचा भाग येथे वाचा 
http://parichit-javalacha.blogspot.in/2012/04/3.html 2 comments:

  1. itaka vishal dongar..............pahunach chakkar alyasarakh hotay.......

    ReplyDelete
  2. are photot jara chotach distoy to...bhayankar motha ha dongar, kadhich kuthe pahila navhata asa...agadi zakaas...tyachya savalitun chalatana farach anand vatat hota... :)

    ReplyDelete