Thursday, March 15, 2012

"एक ग्रुप असा हवा..."

सगळेच ओळखीचे मित्र आपले चांगले...जवळचे मित्र असतात असं मला वाटत नाही. कोणताही व्यक्ती कितीही चांगला असो त्याचं सगळ्यांशीच जमतं असं काही नाही. ज्याचं आपल्याशी जमतं त्याच्याशीच आपलं जमतं. ज्या व्यक्ती वर आपलं खूप प्रेम असतं त्याच्याशी आपणच जुळवून घेतो. पण चांगल्या मित्रांबरोबर जास्त करून तसा प्रश्न येतंच नाही.कारण भरपूर अश्या गोष्टी असतात कि ज्याच्यावर चांगल्या मित्रांची कायम सहमती असते. कधी कधी होतो वाद, पण तो जास्त काळ टिकत नाही. इथे समजावून म्याटर सोडवण्यापेक्षा शिव्या देऊन..मारून..मार खावून सोडवावा लागतो (तुमच्यावर कोणतीही वेळ येऊ शकते).ह्या सगळ्या आयटम लोकांना आपल्याला सोडवतच नाही.कुठेही जायची ...खायची...प्यायची प्लान्निंग त्यांच्याच बरोबर होते.त्यांच्याच बरोबर वेळ घालवायला आवडतो, कारण त्यांच्याच बरोबर आपल्या बहुतेक आठवणी जुळलेल्या असतात. याच एक कारण हे पण असू शकत कि हेच सगळे मित्र कायमपणे आपल्या बरोबर होते/असतात/आहेत...सुख...दुख... बहुतेक प्रसंगी.त्यांना सोडून आपण वेगळा आनंद कधी साजराच केलेला नसतो किव्वा करायचा नसतो. म्हणून प्रत्येक आठवणीत त्यांची आठवण जरूर असते.

मग ह्या ग्रुप बद्दल बोलायचं झालं तर प्रत्तेकाला प्रत्येकाची अगदी डिटेल माहिती असते.त्याच्या आवडी निवडी...वेगवेगळ्या सवयी... कुणाचा घोडा कुठे अडकला आहे... वगैरे वगैरे. ह्या सगळ्यां बरोबर आपण काही शहाणपणाची गोष्ट बोलूच शकत नाही, कारण त्यांना अगदी व्यवस्थित माहित असतं कि आपण काय चीज आहोत ते (किव्वा कीस झाड कि पत्ती आहोत :) ). "हा.. हा.. महाराज आपण नका सांगू आम्हाला, आपल सगळं माहित आहे ","ओ...हो...असं का,आम्हाला तर माहीच नव्हतं यार " "आपण...असुद्या (अगदी नमस्कार करून ) " हि तर नेहमीचीच वाक्य झालीत. असं असून सुद्धा आपल्याला काही वायीट वाटतं नाही, आपण आपोआप झेलून घेतो सगळं.

ह्या सगळ्यानबरोबर असल्यावर वेळ कसा जातो काहीच कळत नाही. कधी कधीभूत काळातले कित्तेक विषय बाहेर काढून त्याचं विश्लेषण केलं जातं,अगदी खोल पर्यंत.लई भारी भारी डायलॉग जोडले जातात त्याच्या बरोबर. एखादा प्रसंग आपण जीव काढून सांगत असतो कि "तुम्हाला माहित आहे का किती वाट लागली होती माझी..असं... तसं" आणि इकडे सगळे दात काढत असतात. जी काही गंभीरता होती तिची अगदी वाट लावली जाते,पुरेपूर वाट आणि मग आपल्याला पण हसू येतं त्यावर. नंतर वाटत कि खरच इतका गमतीशीर प्रसंग होता का तो? तो नसतोच पण ह्या ग्रुप मुळे तो बनून जातो.

यांच्या बरोबर आपण काहीही बोलू शकतो दिल खुलास पणे, कारण इथे काही मान अपमान उरलेलच नसतं, आणि हे पण माहित असतं कि इथे जी गोष्ट बोलली जायील ती ह्यांच्या पलीकडे जाणार नाही, त्या मुळे एक वेगळीच निर्धास्तथा असते.जेव्हा निर्धास्त असतो तेव्हाच आपण खरा आनंद लुटू शकतो भले मग ते काही काम असो किवा एखादा खेळ.ह्या गोष्टीच खरच यार फार महत्व आहे आपल्या जीवनात, आणि ह्या ग्रुप मध्ये ती आपल्याला पुरेपूर अनुभवायला मिळते.

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे,एखाद्या प्रसंगी जर एखादा ग्रुप मेंबर नसला तर त्याची अत्यंत उणीव जाणून येते.कारण प्रत्येकाचे रोल ठरलेले असतात त्याची जागा कुणीच भरून नाही काढू शकत, त्याचे डायलॉग तोच मारू शकतो, दुसऱ्याला ते जमतच नाही आणि जमणार पण नाही. प्रत्तेकाची एक विशिष्ट शैली असते काही वाक्य बोलण्याची, त्याची उणीव प्रकर्षाने भासते. कोण कधी काय बोलेल भरोसा नाही,आणि कोणत्या वाक्यावर आपण अगदी लोट पोट होऊन हसत बसू काही सांगता येत नाही.

चांगल्या मित्रांबरोबर घालवलेल्या क्षणांबद्दल काय लिहू ? तुम्ही जस्ट मनात तो ग्रुप आणा मग लगेचच सगळ्या आठवणी झटकन डोळ्यांसमोर येतील आणि तुम्हाला कळेल कि तुमच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मायील पसरली आहे.आज वर्तमान काळात जे क्षण आपण घालवू तेच उद्या आठवण बनून जातील म्हणून जितका चान्स भेटेल तितका वेळ आपल्या चांगल्या मित्रांबरोबर घालवा. कारण ह्या धकाधकीच्या (so called busy and stressfull ) जीवनात निखळपणे हसायचे प्रसंग अगदी कमी आहेत आपल्याकडे, म्हणून हसून घ्या...खेचा एकमेकांची आणि कधी कधी खेचली पण जाऊ द्या काही प्रोब्लेम नाही.

7 comments:

 1. This is my Good luck that I found your post which is according to my search and topic, I think you are a great blogger, thanks for helping me out from my problem..
  1996 Mazda GLC AC Compressor

  ReplyDelete
  Replies
  1. Hello Sheena...i donno in what way my post helped you...but if it has benefited you... i am more than happy... :) thanks for visiting my blog

   Delete
 2. Nice one mama.

  I still remember the hostel time after 23hrs when i was compulsory to visit your room !!

  ReplyDelete
  Replies
  1. hummmm....i too remember that...salya agadi vaitakun jayacho me...pan aata hasu yayala lagalay tyavar... i am surely going to write on that... :)

   Delete
 3. mastt lihitos Mama...asach chalu thev lihin..

  ReplyDelete
 4. mastt lihitos Mama...asach chalu thev lihin..

  ReplyDelete
  Replies
  1. Thanks re rahul...:)
   aani lihinaar re mi bharpur...tu only vacha raha... :)

   Delete