Friday, January 13, 2012

" तू माझी...तीच लहर आनंदाची…"

" वाट पाहत असतो मी बाहू पसरून…
        असते खात्री कि तू येशीलच उसळून…
परंतु भेटते क्षणभरच तू…
        आणि  मिठीतच माझ्या  जाते विरघळून…"

" परत कधी येणार तू... 
      याचीच मनाला लागते हूर हूर…
विरहाचे हे क्षण होतात असह्य..
      आणि मनात माजते माझ्या भावनांचे काहूर..."

" राहणार  विरहातही  मी...तोच अढळ किनारा तुझा...
       आणि आहेच खात्री राहशील तू माझी...तीच लहर आनंदाची…"    

2 comments:

 1. " राहणार विरहातही मी...तोच अढळ किनारा तुझा...
  आणि आहेच खात्री राहशील तू माझी...तीच लहर आनंदाची…"

  वाह ...अगदी ओथंबून आलेले भाव.... मस्त एकदम...!!

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद चैताली...!!!! :)
   भाव एक्स्प्रेस करण्यात तुम्ही फार पुढे आहात... आम्ही येतोय मागून.. हळू हळू...!!!! :)

   Delete