Monday, January 9, 2012

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...

कधी पासून म्हणतोय काही तरी लिहू काही तरी लिहूपण काय करू यार जमतच नव्हतं. नवीन वर्ष्याबद्दल तर लिहायचंच होतं पण त्या व्यतिरिक्त खूप विषय साठले आहेत मनातखूप वेळेस तर सुरुवात पण केली होती लिहायला पण जवळ जवळ सर्वच पोस्ट "ड्राफ्ट" म्हणुनच सेव असलेल्या दिसत आहेत हो. पण आता वाटलं कि नवीन वर्ष सुरु झालंयतर मग काही तरी रेझोल्युशन करायला हवं ना :) म्हणून ज्या प्रकारे मी मागे थोडं फार का होयीना नियमित लिहायचो तेच पुढे कंटिन्यू करायचं ठरवलं आहेम्हणजे नवीन असं काही नाही तर जे काही पूर्वी होतं तेच टिकवायच ठरवलं आहे.

ह्या पोस्ट मध्ये मी मुद्दामून जरा मोठ मोठे (जड असे)  शब्द वापरणार आहे, (मी ते सहसा दैनंदिन जीवनात वापरत नाही) कारण इतके मोठे शब्द वापरावे लागतील असं मी कोणतंच काम नाही करत. पण कधी तरी त्यांची गरज नक्कीच भासते, असेच शब्द आहेत ते आणि आज खरच मला ते लागत आहेत.    

ते असं कि आपल्या पैकी बरेच जन नवीन काही तरी करायचं असं ठरवतात...मस्त सुरुवात करतात...पण काही न काही कारणामुळे ते पूर्ण करायचं राहून जातं.  कारण काय तर सातत्याचा अभाव (जो माझ्यात पुरे पूर आणि ठासून भरलेला आहे तो) कोणतीही चांगली सवय लावण्यासाठी म्हणे कमीत कमी २१ दिवस लागतातसातत्याने केली तरनाही तर भरपूर दिवस लागू शकतात (आणि मग शंकाच आहे :)) असो... सातत्य..किती लहानसा शब्द आहे हा...पण चांगलाच घाम गाळतो आपला. जीवनात कुठलीही गोष्ट करायला...सातत्य हवंच... (अगदी मुंबई-पुणे-मुंबई ह्या सिनेमा मधल्या "अभिमान हवा" ह्या डायलॉग प्रमाणे.. ठासून) आता लिहिता लिहिता वाटलं कि जरा विचार करू ह्या गोष्टीवर कि  आपल्या कडून (माझ्या सारख्या मंडळींकडून) एखादी छान अशी गोष्ट सातत्याने का नाही होतं. मग वाटलं कि ती मला लागत नाही म्हणून. म्हणजे आपल्याला भूक कशी लागतेते लागणं. भूक लागते म्हणून आपण जेवतोतहान लागते म्हणून आपण पाणी पितो. मग परत विचार आला ह्या तर मुलभूत गरजा आहेत ह्यांच्या शिवाय तर जगणं अवघड. पण मग सचिन का म्हणतो कि मी क्रिकेट शिवाय जगू नाही शकत...बच्चन का म्हणतो कि अभिनयच माझ्यासाठी सगळं काही आहे?  असं कसं शक्य आहेह्या तर मुलभूत गरजा नाही वाटत मग...पण मग परत विचार आला कि हे सहज शक्य आहे...पण केव्हा..जेव्हा आपली आवडच आपलं जीवन बनते...मग ती आवड एखादी वस्तूसवय किव्वा व्यक्तीहि  असू शकते. मानसशास्त्राने पण असंच सांगितले आहे कि ज्या गोष्टी बद्दल आपण कायम विचार करू किव्वा कायम तिचंच मनन चिंतन करू तर ती आपल्यात यायला लागते किव्वा आपण तिच्या सारखं बनून जातो. मग आपलं स्वतःच काही अस्तित्वच राहत नाही. म्हणजे मग एखादी गोष्ट जर का जीवनात उतरवायची असेल तर पहिले ती मनात उतरली पाहिजे आणि तिच्या शिवाय दुसरं काहीच दिसायला नको. पण मग माझ्या सारख्या माणसाला सर्व काही कामं सांभाळून करता येयील का हे सगळं..( काही कामं महत्वाची असतात, काही महत्वाची नसतात पण फार वेळ खातात हा एक प्रोब्लेम) ?  जर का तिकडेच लक्ष दिलं (भलेही ती गोष्ट मला फार आवडते पण तरीही ) तर मग बाकीचे काम राहून जातील ना , बऱ्याच मंडळींना हा प्रश्न कधीना कधीना पडलेला असतो. म्हणजे दिवसभर तेच समोर ठेवणं जरा अवघड वाटत. यावर उपाय काय ? उपाय हाच कि रोज हळू हळू पण अगदी सातत्याने आणि मनपूर्वक ती गोष्ट करावी लागेल. 

म्हणजे….ह्या वर्षी गिटार नक्की शिकायची असं वाटत असेल तर रोज ती गिटार वाजवलीच गेली पाहिजे, ५ मिनिट का होयीना टून टून करायलाच पाहिजे. समजा मला छान लेखक बनायचं आहे तर रोज ३०० -४०० शब्द लिहिलेच गेले पाहिजे, विषय कोणताही का असेना चालेल, पण रोज मनातून पानावर लिहिलेच गेले पाहिजे. कविता नाही तर चारोळ्या तरी केल्या गेल्या पाहिजेत. जिम मध्ये आठवड्यातून कमीत कमी ५ वेळा गेलंच पाहिजे (कधी फक्त हात पाय हलवून आलात तरी चालेल पण सवय तुटायला नको)  असं जर का केलं तर उशिरा का होयीना लेट पण थेट जाऊ...म्हणजे जे हवं ते साध्य करूच. 
                 
आता वर लिहिलेलं मलाच थोडं जड झालेलं वाटत आहे म्हणून इथेच थांबतो. बाकी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, (पण थोडं घेतलं तर फायदा नक्कीच होयील हो) तर मग ह्या नवीन वर्ष्याच्या तुम्हा सगळ्यांना अगदी मना पासून शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना अगदी सुखाचं, भरभराटीच आणि मेन म्हणजे इच्छापुर्तीच जावो.                  

      


   

2 comments:

  1. Finally, kahitari lihila...good one.

    ReplyDelete
  2. thnx yaar...but cant identify...jara sangta ka aapan kon aahat?..mhanaje jara changala vatel... :)

    ReplyDelete