Saturday, May 28, 2011

बातम्या...माहितीदायक कि त्रासदायक?

काल असाच टीव्ही बघत असतांना मराठी बातम्या लागल्या. फार दिवसांनी वाटलं कि बघाव्यात मराठी बातम्या, तेव्हडच काय चालू आहे महाराष्ट्रात,खेड्या पाड्यात.,.. ते तर कळेल.

सध्या बातम्या देतांना एक नवीन फ्याड सुरु झालंय. ते म्हणजे बातम्या सांगतांना तो बातमीदार त्याच पूर्ण ऑफिस भर फिरत असतो. मग आपल्याला सगळं व्यवस्थित दिसत कि कोण काय करत आहे म्हणून. खर तर ह्या वेळी सगळ्यांना खास सूचनाच दिल्या जात असतील कि, बातम्या देतांना तरी काम करा :) म्हणून सगळे शांतपणे काम करतांना दिसतात. जो बातमीदार असतो तो आपली कशाशी टक्कर न होवो याचाच जास्त विचार करत असतो, कारण साधारण माणूसच न तो एका वेळी २-२ काम कशी करणार. सगळं त्याच्या त्याच्या घाबरट हालचालींवरून सरळ सरळ दिसतं, नेहमी न चुकता बातम्या देणारे सुद्धा चुकायला लागतात...असो.

तर मग बातम्या सुरु झाल्या..
पहिली बातमी..हि होती एका मुली बद्दल..बिचारी कर्क रोगाच्या च्या चौथ्या स्टेज मध्ये होती पण तिला उपचार देतील असा एक पण दवाखाना मिळत नव्हता. खर तर कर्क रोगाच्या च्या तिसऱ्या स्टेज पासून गोळ्या औषधे फुकट मिळतात, तश्या जाहिराती पण आपण टीव्ही वर बघितल्या असतील. ती नागपूर ला आली उपचारासाठी, पण तिथले डॉक्टर म्हणाले कि हि आमच्या एरिया मधली केस नाही (दुसरी अपेक्षा काय करणार यांच्या कडून). तिथल्या हेड डॉक्टर ला विचारले असता तो म्हणतो कि अजून चौथ्या स्टेज मधल्या पेशंटवर उपचार करायची ट्रेनिंग अजून नाही मिळाली सगळ्यांना. तिने इच्छा मरणा साठी राष्ट्रपतींकडे अर्ज पण केला आहे (दुसरा ऑप्शन काही नाहीच उरणार कारण सगळे हात वर करणारे आहेत आपल्या कडे). बिचारी.. तरुण वयात इच्छा मरण मागतेय, या पेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणतीच नसणार.
पहिली बातमी पाहूनच पुढे पाहण्याची इच्छा संपली. पण बसलो तसाच.  

दुसरी बातमी.. हि होती एका लहान मुलाबद्दल. बिचारा...१०-१२ वर्षाचा असेल तो, काही श्लोक म्हणत बसला होता. पण...हे श्लोक काही देवाच्या स्तुतीपर नव्हते तर मृत शरीरास दफन करतांना म्हणावयाचे श्लोक होते. त्याचे वडील एका स्मशान भूमी मध्ये पुरोहिताच काम करायचे. म्हणजे मृत शरीरास काही ठराविक विधी प्रमाणे दफन करतात ना, तो विधी ते पार पाडायचे. त्याचं नुकतंच निधन झालं. मग आता घर कारभार..? घरात हा एव्हडाच पुरुष आणि मग त्याच्या बहिणी आणि आई. त्याला हे काम करण्या वाचून काही दुसरा मार्ग नव्हता. फार वायीट वाटलं त्याच्या कडे पाहून. ज्या वयात क्रिकेटची ब्याट घेऊन मुलं गल्लो गल्ली फिरतात त्या वयात हा लहान मुलगा मयत पुरण्यासाठी स्मशानभूमीत जागा शोधत होता.  काय बोलू मी यावर...देव त्या लहान मुलास खूप खूप शक्ती देवो.
तर अशी होती हि दुसरी बातमी, काय विचार करून बातम्या पाहायला बसलो आणि...असो.
   
तिसरी बातमी...ते असं म्हणतात ना कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. खरच आहे गाय नाही मरत पण त्या कावळ्याने एका एरिया मधली वीज ९ तास गायब करून टाकली होती. तर बातमी अशी होती कि, एक कावळा विजेच्या तारेत अडकून मेला होता. तर तिथल्या लोकांनी लवकरच तक्रार केली. पण आपल्याला माहीतच असणार ते आलेत कि नाही, म्हणून ते नाही लिहित. तिथे एका घरात लग्न होतं, तिथल्या एका महिलेस वीज गेल्या नंतर झालेल्या त्रासा बद्दल विचारले असता, ती तर फार भडकलेली दिसली. ती म्हणाली, 'आमच्या घरी भाच्याचं लग्न होतं, सगळे पाहुणे बिना आंघोळीचे गेले. तिथे त्या ऑफिस मध्ये कधी कुणीच नसतं, कुणी नसलं तरी सगळे पंखे चालू असतात'..असं तसं खूप बोलल्या त्या. आणि बोलणार नाही तर काय करणार. एव्हडच तर करू शकतो आपण, सगळं जर करू शकत असतो तर तो कावळा त्यांनीच काढून टाकला असता...असो. तर मग वीज कंपनीतील अधिकाऱ्यास याबद्दल विचारले असता तो काय म्हणाला, तो म्हणे कि तिथल्या गल्ल्या सगळ्या छोट्या छोट्या आहेत, आम्हाला तिथे तो कावळा सापडलाच नाही (हे भगवान... वाचव रे). बर झालं हा असं नाही बोलला कि आमच्या इथे कावळा काढण्याची ट्रेनिंग नाही दिली म्हणून..तेव्हडच आपलं भाग्य.  

मी पण काय इथे तुम्हाला बातम्या सांगत बसलो. चांगलंच बोर झालं असणार तुम्हाला. बातम्या आपण बघतो काही तरी कळेल म्हणून कि काय चालू आहे आपल्या राज्यात. पण यार ह्या बातम्या बघितल्यावर फारच टेन्शन वाढलं. ज्या लोकांबरोबर हे सगळं घडत असेल, ते बिचारे...आपण चानेल बदलून पळून जाऊ शकतो. पण त्याचं काय?...अवघडच होत असणार. कुठे त्यांच्या बातमीच प्रक्षेपण चालू असो किव्वा नसो, ते लढतच असतील तिथे....

बातम्या संपल्यावर मला कळलंच नाही कि ह्या किती माहितीदायक, (खरी परिस्थिती दाखवणाऱ्या) होत्या कि भयंकर त्रास दायक (खरी परिस्थिती दाखवल्या मुळेच) होत्या ?Wednesday, May 11, 2011

" खरच..हा तुझाच खेळ सये.."


"  भिजतो मी एकटाच पावसात 
समजून तुझीच आहे साथ...
मनात चिंब भिजलेली तू, 
आणि तुझा मी धरलाय हात…
मन माझे तुझ्या ओल्या अधरांवरील थेंब बनू पाहे…
खरच..हा तुझाच खेळ सये.."

"  नेहमीचा आहे रस्ता, 
तरी पण माझी चुकते वाट…
मध्य रात्री माझे उठणे, 
समजून कि आता झाली पहाट…
प्रत्येक स्वप्नात असते तुझे येणे जाणे…
खरच..हा तुझाच खेळ सये.."

"  फिरवतो फुलांवरून हळुवार हात समजून तुझे सुकोमल गोरे गाल...
असतो मी कायम सरवान्म्द्धे,  
पण कधी हरवतो कुठे कुणी न जाणे...
तासंतास बघत असतो शांत निळ्या नभाकडे…
खरच..हा तुझाच खेळ सये.."