Wednesday, March 16, 2011

" माझी भ्रमंती - तळेगाव ते रोहा - भाग २ "

पहिला भाग इथे वाचा


पाली क्रॉस केल्या वर रोह्याच्या अलीकडे पर्यंत तुम्हाला साथ देते ती म्हणजेअंबानदी. आपण ह्या नदीचं नाव जास्त कधी ऐकलं नसेल कारण जरा छोटेखाणीच आहे हि, पण कुठे कुठे तीच विस्तीर्ण पत्र दिसूनच जातंनदी शेजारून फार वळणावळणाचा रस्ता आहे. गाडी अगदी सांभाळून चालवावी लागते कारण थोडी सरळ चालवली कि लगेचच टर्न मारावा लागतो. घनदाट अशी झाडी असल्याने समोरुण येणारी  गाडी लवकर दिसतंच नाही. अगदी टर्नच्या जवळ आल्यावर कळत कि पुढून गाडी येतेय म्हणून. मग वाटत, "च्यायला..हा कधी आला..?" (समोरच्यालाही तसच वाटत असावं).

अंबा नदी मध्ये मध्ये दर्शन देतंच होती. गाडी चालवता चालवता मी तिच्याकडे थोडा बघून पण घ्यायचो पण लगेचच पुढे बघावं लागायचं. गाडी चालवतांना...नको रे बाबा चान्स घ्यायला..अश्या रस्त्यात समोरच बघितलेलं बरं.  पण यार..मला काही मोह आवरला नाही त्या नदी जवळ जाण्याचा. एक छान जागा दिसली जिथून खूप लांब पर्यंत नदीचं नागमोडी वळण दिसत होतं. मग काय गाडी लावली रस्त्यावर आणि गेलो खाली.

                 


खाली पोहोचताच 1 माणूस मासे पकडत असतांना दिसला. तो जाले फेकत आणि ते मध्ये मध्ये जाळ्यात काही तरी अर्रेंज करत होता. मी सामान बाजूला काढलं . पाणी अगदी साफ दिसत होतं, कारण वाहत होतं ना ते. खळखळनाऱ्या पाण्याचा आवाज आणि वाहतं पाणी माणसाच्या मनाला वेगळीच नशा आणते. जो तिथे असेल त्याच्या मनात दुसरे विचार येणारच नाहीत. मग एक जागा शोधली तिथे पाण्यात पाय टाकून बसलो आणि इकडे तिकडे बघू लागलो.

                                  समोरच्या बाजूला मस्त छोटे छोटे डोंगर होते. हिरवे गच्च. मधूनच कुठून तरी पक्ष्यांचा आवाज यायचा. अगदी डोळ्यांना तृप्त करणारं दृश्य होतं ते. ती नदी अशी माझ्या डाव्या बाजूने वाहत येत आणि उजवी कडे नाग मोडी वळणे घेत पुढे गेली होती. नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर लांब पर्यंत काळा खडक दिसत होता, यावरून भर पावसाच्या दिवसात ह्या नदीचं पात्र किती मोठं होत असेल याचा अंदाज मला आला. तो मासे पकडणारा माणूस माझ्या उजव्या बाजूला थोडा दूर होता. अगदी छाती पर्यंत असलेल्या पाण्यात तो उभा राहून त्याचं जाळं टाकत आणि निट करत होता. छान थंड वातावरण होतं. मनात विचार आला कि, मित्रांबरोबर इथे परत यावं आणि ह्या नदी किनारी मस्त क्यांप करावा. काय मजा येयील यार..! सही एकदम..!

                                 

फार शांत वाटत होतं. इतकं शांत कि मला वाटलं आता डोळे लावले तर लगेचच झोप येयील. लगेचच उठलो, ते शीतल थंड पाणी तोंडावर मारलं, सामान उचललं. रस्त्या वर आलो आणि परत एकदा नदीकडे बघत गाडी सुरु केली आणि मी निघालो.

आता रोहा फक्त १२-१५ किमी बाकी होतं. जसा जसा तो किमी चा दगड कमी अंतर दाखवू लागला तस तसा आनंद वाटू लागला, कारण फार दिवसांची इच्छा पूर्णत्वावर येतांना दिसत होती. रस्ता तर फारच छान होता. चारही बाजूंना हिरवेगार डोंगर होते आणि जिकडे तिकडे शेतीच शेती दिसत होती. मस्त हिरवं वातावरण होतं ते, डोळ्यांना किती शांत वाटत अश्या वातावरणात. काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध लोकांनी काही तरी वाळलेल्या काड्यासारख पसरवून ठेवलं होतं. म्हणजे येता जाता गाड्या त्यावरून जाव्यात एव्हडाच उद्देश. त्याच कारण असं आहे कि. त्या काड्या ज्या होत्या न त्या तुरीच्या डाळीच्या (?)होत्या. त्यातून डाळ काढणे जीवावर येत असेल म्हणून तिथले लोक काय करतात, तर हे असं रस्त्यावर टाकून देतात. यामुळे ती डाळ निघण्यास चांगलीच मदत होते. किती साधा आणि सोपा मार्ग, सही डोकं लावलं होतं त्यांनी..मानलं बॉस..!  ह्याच विचारात रोहा लागलं पण.        

रोह्यात इंट्री करताच तुमचं स्वागत करते ती म्हणजे "कुंडलिनी" नदी. फार मोठं पात्र आणि निळेशार पाणी असलेली.
                                      

नदीला क्रॉस केला तरच गावात पोहोचता येते. आता रोह्यात मी ज्या ठिकाणी जाणार होतो ती जागा म्हणजे मला काही एका तीर्थक्षेत्रा पेक्षा कमी नव्हती. म्हणून हात पाय धुवून जाण्याचा मी निर्णय घेतला. रस्त्यावर चालत असलेल्या स्थानिक लोकांना विचारली चांगली अंघोळ करायची जागा. बिचाऱ्यांनी मस्त सखोल सांगितलं म्हणजे नदी कुठे खोल आहे, कुठे उथळ, कुठे अंघोळ करण्यालायक वगैरे वगैरे. मग गेलो तिथे आणि साध हात पाय धुण्याऐवजी घेतली अंघोळ करून. कारण तिथे १५-२० तरुण मुलं पहिलेच नदीत मनसोक्त डूम्बतांना दिसले. घ्या मग मला लाज वाटायचं काही कारणच नव्हतं...बरोबर ना..मग..! कुठे ते 'उन्हेरे' कुंडातल गरम गरम पाणी आणि कुठे हे नदीचं अगदीच थंड पाणी. पहिले २-४ मिनिट होतो प्रॉब्लेम, पण मग एकदा का घुसलं पाण्यात मग काही टेन्शन नाही..नदी आपलीच. सकाळ पासूनची हि माझी तिसरी अंघोळ होती. एकटा होतो म्हणून बरं होतं दुसरा कुणी बरोबर असता तर पागलच झाला असता, परत कधी आला नसता माझ्या बरोबर...असो.

                                   

सगळं आटोपलं आणि ज्या महापुरुष्याचं घर बघण्यासाठी मी आलो होतो तिकडे निघालो. दर्शन घेऊन अगदी तृप्त झालो, किती दिवसांची मनात असलेली इच्छा आज पूर्ण झाली होती. काही तरी वेगळं प्राप्त केल्याचा आनंद झाला होता. कारण सगळ्यांच्याच नशिबात नसतं असं. 

मग तिथल्या एका घरघुती मेस मध्ये जेवण करून परत निघालो. (पहिले तर त्यांना वाटलं कि महिन्या भराचा डब्बा हवाय मला. मग त्यांना सागितलं कि काकू..आताची भूक शांत होयील इतकंच हवंय). आलो त्याच रस्त्याने निघालो, नवीन रस्ता शोधला असता पण इतका वेळ नव्हता. लवकरच पालीला पोहोचलो. नेमकी चतुर्थी होती आज...वाह काय योगा योग (चतुर्थी होती हे मला माहीतच नव्हतं, सकाळी विजयला अंबा नदीहून फोन केला होता, तेव्हा त्यानेच सांगितलं होतं). बल्लालेश्वराला नमस्कार केला. वाटलं काय सही दिवस आहे आजचा किती पवित्र गोष्टी पाहायला भेटल्या. मग काय सुसाट निघालो तिथून कारण संध्याकाळ होतंच आली होती, डायरेक्ट लोणावळ्याला गाडी थांबवली. मस्त एका टपरी वर चहा मारला आणि मग अर्ध्या एक तासात आपलं आपलं घर गाठलं.


6 comments:

 1. He vachun tar mala pan javese watatey. Khup sunder varnan kele aahes.

  ReplyDelete
 2. Thanks re roops.. :)
  are Raigad district khoop chaan ahe...chance milala tar nakki jaun ye..

  ReplyDelete
 3. Thanks sachin...:)
  chala kadhi tari time bhetala tula vachayala... :)

  ReplyDelete