Monday, March 21, 2011

' किस्सा रेल्वे क्रॉसिंगचा 'चांगल्या चांगल्या लोकांना पळवायला लावणारी गोष्ट म्हणजे लोकल ट्रेन. कधी कधी किती काकूंना साडी धरू कि लोकल धरू अश्या अवस्थेत पाहिलं आहेरेल्वे क्रॉसिंग वरून ह्या गोष्टी व्यवस्थित दिसतात कारण तिथे ते फाटक उघडल्या शिवाय काहीच करता येत नाही. तो पर्यंत काय, तर मग शांत उभं राहणं आणि अशी लोकांची गम्मत पाहत बसणं. रेल्वे क्रॉसिंगला दोन्ही बाजूला जागा असते पायी चालणाऱ्या लोकांना क्रॉस करण्यासाठी. कोणतीही व्हीलर जाण्यास फारच त्रास होयील तिथून. मध्ये लोखंडी फाटक असते आणि त्याच्या मधो मध लाल सिग्नल. तर मग या फाटका जवळ म्हणजे रेल्वे क्रॉसिंग जवळ मी पाहिलेले - किस्से आता तुम्हाला सांगतो.    लोकल आली कि आजू बाजू जरा गोंधळाच वातावरण तयार होतं, कारण लगेचच निघते न ती. तर मग त्या दिवशी लोकल आली, जे थोडे दूर असतात होते त्यांनी लगेचच पळायला सुरुवात केली. असंच एक जोडपं (नक्की नाही..पण आता पुरतं कपलच समजू) थोडं घायीत दिसलं. मध्ये ते फाटक होतं. तो मुलगा पटकन थोडा खाली वाकून फाटका खालून निघून फलाटावर पोहोचला. तो खालून जाता जाता ओरडत होता कि खालून ये खालून ये म्हणून. पण त्याच्या बरोबरची मुलगी...? ती खालून न जाता सायीडला गेली आणि तिथून यु टर्न मारून पुढे निघाली. फारच ताट मानेने जगणारी मुलगी असेल हि, कुठेच मान नाही वाकवणार वाटत. तो बिचारा तिथे त्या डब्ब्यासमोर जाऊन उभा होता, आणि जोर जोरात हात वारे करत होता तिला कि लवकर ये म्हणून. बाई साहेबांनी प्लेटफॉर्म च्या पायऱ्या चढल्या चढल्या लगेचच गाडीचा भोंगा वाजला. लोकल ला काय - सेकंदात स्पीड घेते ती, ह्या बयाने - पाउल टाकले टाकले लोकल निघाली सुसाट. बिचारा तो मुलगा घडी घडी कधी तिच्या कडे तर कधी ट्रेन कडे बघत होता. लोकल सुटल्याचा हताशपणा त्याच्या चेहऱ्यावर सहजच दिसून आला. कारण त्याला माहित असावं कि आता तास लोकल नाहीच म्हणून. आणि हि बया असे हावभाव दाखवत होती कि ते जणू दादर वगैरे ला कुठे तरी उभे आहेत जिथे दर मिनिटाला लोकल येते म्हणजे येतेच. असे हाव भाव दाखवणे तिला गरजेचेच होते, कारण तिला माहित होते कि थोडी मान वाकवली असती तर ट्रेन सापडली असती. आता बसतील दोघे तास टायिम पास करत (ती बया बहुतेक ताट मान करूनच बसली असणार :))  

दुसरा किस्सा- ट्रेन आली प्लेटफोर्म वर. मग आमच्या मागून एक मुलगी पळत पळत आली. मला वाटलं कि पटकन खालून निघून गेली तर मिळून जायील ट्रेन हिलापण हि त्या वरच्या मुलीचीच बहिण वाटली, बाईसाहेब इतकी घाई असतांना सुद्धा वाकल्या नाहीतच. क्रॉसिंग च्या कोपरयाने त्या अवघड जागेतूनच पुढे गेल्या...धन्य आहे...नमस्कार यांना. इकडे भोंगा वाजला पण. ह्या बयाची हायीट म्हणजे हि हात देऊन ट्रेन थांबवायला लागली. घ्या आता हि काय टम टम ( व्हीलर) आहे कि जी हाताचा किव्वा शिट्टीचा इशारा होताच डिस्क ब्रेक असल्यागत लगेच थांबते. तर नाही हि आहे लोकल ट्रेन, निघाली ती निघाली. बिचारीला कसच झाला वाटतं, मग ट्रेन गेली तिकडे हि पण चालत गेली, मान खाली घालून :).

आता पुढचा किसा हा वरच्या दोन्ही किस्स्यांच्या अगदी उलट आहे. म्हणजे घाई नसतांना घाई केली तर काय होयील याचा उत्तम उदाहरण. ते कसं आहे कि तुम्ही निघालात कुठे तरी तर मग मधेच हा असा रेल्वे क्रॉसिंग पाहून थोडा जीवावर येतं. फालतू टायिम पास होयील असं वाटतं. मग एकाची वेळ वाचवण्याच्या नादात बरीच फजिती झाली. ते असं कि मी क्रॉसिंग जवळ पोहोचायच्या अगदी पहिलेच सिग्नल लागला. आता मला लोकल चा टायिम माहित असल्याने हा सिग्नल लोकलचा नसून कोणती तरी फास्ट ट्रेन इथून जाणार म्हणून लागला आहे हे कळून चुकलं होतं. मग मी गाडी बंद करून समोर बघायला लागलो. पलीकडच्या क्रॉसिंग समोर पण थोड्या गाड्या जमल्या होत्या. तिथे एक महाशय आले. त्यांनी दुरूनच बघितलं असावं कि सिग्नल आताच लागला म्हणून. बहुतेक त्यांना फार घाई होती आणि रेल्वे क्रॉस होण्यास थोडा वेळ पण असल्याने त्यांनी खालून जाण्याच्या प्रयत्न सुरु केलाते गाडीवरून डाव्या बाजूला उतरले. त्यांनी गाडी थोडी तिरपी केली, ते पण वाकले आणि गाडी पुढे नेण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागले. आता सरळ असलेली गाडी पण पुढे ढकलण्यास कधी कधी जीवावर येतं आणि त्यातल्या त्यात तिरपी गाडी आपण किती वेळ धरू शकू? फारच अवघड असं काम आहे. आता ह्या गोष्टी समोरच्या व्यक्तीला नक्कीच ठाऊक असणार तरीही तो जे काही दिव्य करत होता त्याला खरच नमस्कार !

तर मग तिरपी गाडी आणि तोही कमरेत वाकलेला, अश्या अवघड अवस्थेत त्याला ती गाडी पुढे काही ढकलता येयीना. त्याने गाडी सरळ केली. मला वाटलं कि नाद सोडला याने. पण नाही हो, महाशय गाडीवर बसले आणि आता उजव्या बाजूने उतरले. आई शप्पथ...डेंजर माणूस दिसतोय..! परत तिकडून पण त्याने तसाच निष्फळ प्रयत्न केला (निष्फळ म्हणजे त्याला हे कृती केल्या नंतर कळलं). काही जमेना म्हणून परत त्याने गाडी सरळ केली आणि गाडीवर बसला.

क्रॉसिंग वर उभा असलेला प्रत्येक व्यक्ती हा फक्त त्या सिग्नल कडे बघत असतो. म्हणजे कधी हे फाटक वर जायील आणि मी इथून गाडी काढेन असं झालेलं असतं. पण आज सगळ्याचं लक्ष त्या महामानवा कडे लागून होतं आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर असलेलं हसू मला पलीकडूनही दिसत होतं. तो जरा घामेघूम झाला होता. त्याने रुमाल काढला आणि घाम पुसला. मला वाटलं झाला शांत हा. पण अहो थांबा..पिच्चर अभी बाकी ही मेरे दोस्त..!  तो परत डाव्या बाजूला उतरला, आणि जिथून ह्या वरच्या ताट मान असलेल्या मुली गेल्या ना तिकडे गाडी ढकलत नेऊ लागला.  (च्यायला...पागलबीगल झाला का हा..!)  वाटलं हे जरा जास्तच करतो आहे हा माणूस (इंजिनियर असावा :)). त्या इतक्याश्या जागेतून कशी काय गाडी घालणार हा असा विचारच करवत नव्हता. नुसती गम्मत पाहण्या पलीकडे दुसरं काही करू शकत नव्हतो (खर तर आता उत्सुकता लागली होती कि साहेब काय आयटम देतात ते). त्याने गाडी त्या यु टर्न मध्ये टाकली आणि त्याने परत....खेळ मांडला....मांडला. तो गाडी पुढे ढकलायचा, त्याच्या कडे जीव काढून ओढायचा, परत तिरपी करून पुढे ढकलायचा. त्या छोट्याश्या जागेत हा खेळ खूप वेळ खेळत होता तो. तिथे जमलेले  लोकं तर कुणीतरी डोम्बारयाचा खेळ दाखवत आहे इतकं मन लावून त्याच्या एक एक कृती कडे बघत होतेबहुतेक त्याचं लोकांकडे अजिबात लक्ष नव्हतं (लक्ष असतं तर कधीचाच थांबला असता :)) असो. मला माहित नाही हे कसं झालं, पण यार...त्याने काढली हो गाडी तिथून (खरच..टाळ्या..!) मानलं बुवा त्याला. पण आता गाडीचा भोंगा ऐकू यायला लागला. त्याने पटकन गाडी चालू करून रेल्वे लायीन क्रॉस केलीचला एव्हडा तरी आनंद कि गाडी क्रॉस होण्या पहिले याने रेल्वेलायीन क्रॉस केली.

एक गोष्ट मी तुम्हाला पहिलेच सांगायला हवी होती कि, माझ्या समोर जे क्रॉसिंगचं फाटक होतं त्याच्या दोन्ही बाजूला सगळ बंद होतं, म्हणजे ताट मानेच्या लोकांना इथे मान खालीच घालावी लागणार होती. दूसरा पर्याय नाहीच. आता हे त्या महामानवाला आधीच माहित असतं तर त्याने इतके कष्ट घेतले नसते. असो. तर मग रेल्वे गेली आणि आता १ मिनिटाच्या आता फाटक उघडणार होतं. याने इकडे तिकडे बघितलं, त्याला कळून चुकलं कि आता पुढे जाणं खरच अवघड दिसतंय (आरती करा याची..). त्याने गाडी बाजूला लावली आणि शांत उभा राहिला. सगळे त्याच्याच कडे बघत होते. बिचारा इतकं सगळं केलं त्याने, पण आता हे फाटक उघडल्या शिवाय काही करू शकणार नव्हता. म्हणजे इतकं करून फक्त ४-५ सेकंद वाचवले होते त्याने (हुर्रेSSSSS). फाटक उघडलं आणि सगळे बरोबरच निघाले.
इतकं तर नक्की आहे तो परत असं कधीच करणार नाही. पहिले रेल्वेला तिचा तिचा मान देयील आणि मगच पुढे जायील. 

आपल्याला नाही कधी इतकी घाई करायची, ३-४ मिनिट वाट पाहण्यात काहीच गैर नाही. ते पण अश्या धोक्याच्या ठिकाणी नको रे बाबा. 'दुर्घटना से दर भली'.