Monday, January 10, 2011

" दोन बिहारी...."

मागे मी लुधियानाला गेलो होतो, मित्राच्या लग्नासाठी. येतांना मुंबई ऐयर पोर्ट वर उतरलो. सामान काही जास्त नव्हतं, म्हणून तसाच डायरेक्ट निघालो. पहिल्यांदाच मुंबई ऐयर पोर्ट बघितलं म्हणून थोडं वेगळं वाटत होतं.लवकर नाशिकला पोहोचणं गरजेचं होतं. मित्राची हळद होती 4 वाजता. वेळे वर नाही गेलो तरी तो पिवळा होणारच होता, पण नंतर मला मात्र लाल करून टाकलं असतं. म्हणून थोड्या घायीतच होतो.
एयर पोर्ट च्या बाहेर आल्यावर लगेच काही लोक गर्दी करतात, तुम्हाला गाडी बद्दल विचारण्यासाठी. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत जरा पुढे गेलो. पण त्यातला एक मनुष्य काही पिछाच सोडायला तयार नव्हता. युपी बिहारचा वाटत होता. त्यात काही नवीन असं नव्हतं. 
“अरे साहबजी बोलीयेतो किधर जाणे का हे",
"नही यार"
"लोकल रेट से ले जायेंगे, बोलिये तो सही”. तो मागेच चालत होता.
आता दुसऱ्याला असं किती टाळणार, आणि असं पण नव्हतं कि मला गाडीची गरज नव्हती. मला दादर रेल्वे स्टेशन वर जायचं होतं. मनात म्हणालो कि 200-300 रुपये लागतील अंदाजाने. तो मागेच लागला होता म्हणून मी थामलो.
म्हणालो कि… “दादर जाना है, कितना लोगे…?”
लगेच तो घाई करू लागला, ‘हा जी सर आप बोलेंगे उधर जायेंगे, आयीये बैठीये, बैठीये’.
मी परत म्हणालो कि, “अरे कितना लोगे वो तो बोलो..?”
तो गाडीचा दरवाजा उघडत “अरे साहबजी आपसे थोडीही ज्यादा लेंगे, जितना सब लेते है, उतना हि लेंगे”
काय गोड बोलतात हि लोकं, एकदम खतरनाक मार्केटिंग कन्सलटन्ट  सारखी, तुम्हाला काय बोलू काही कळत नाही. मेन विषय बाजूलाच ठेवतात.
“फिर भी हजार-दो हजार तो नही न होगा”,
तो हसत “नही साहबजी, इतना थोडीही लेंगे”,
“तो बोलो न कितना लोगे, या मीटर से चल रहे हो?”
मिटरच नाव घेताच त्याच्या चेहऱ्याचे हाव भाव जरा बदलले,
“नही साहबजी, मीटर से नही होता यहा पर… ऐसा किजीये ढायीसो दे दिजीये आप, बस ज्यादा नही”
 मी पण मनात म्हणालो, चांगला माणूस दिसतो , मनात होते तितकेच तो बोलला, मग काही प्रोब्लेम नाही आहे. (खर तर ते भाव कारण जमतच नाही हो, खूप प्रयत्न करतो पण तोंड वळताच नाहि. तुम्ही पण हसत असाल, पण...असो)

बसलो मग ट्याक्षित आरामात. थोडसं चांगलं वाटत होतं, कि काही जास्त पैसे नाही गेलेत म्हणून. लगेच अगदी 2 मिनिटात हायवे लागला. त्याने टर्न घेतला आणि गाडी थांबवली. तो गाडीतून उतरायला लागला .उतरता उतरता म्हणाला कि, “साहाबाजी कुच सिगरेट वगैर चाहिये”. 
कोणी इतका जास्त भाव दिला तर थोडसं वेगळं वाटतच ना.. म्हणजे थोडं हवेत पोहोचल्यासारख.
मी थोडं हसत, “कुछ नही यार, तुम बस जल्दी चलो”.
“अभी आय साहबजी” असं म्हणत तो थोडा दूर गेला.
च्यायला किती छान बोलतात हे लोकं, प्रत्तेक वाक्याला मधाचं बोट लावतात...असो.इकडे दोन छोटे मुलं गाडीच्या काचे जवळ आले आणि “चलो नासिक,नासिक” ओरडायला लागले. इतकेसे छोटे दिसत होते ते, पण आवाज मात्र कोण्या भाई सारखा काढत होते ते. मी काही लक्ष नाही दिलं तिकडे.
तितक्यात हा भाऊ आला, आणि खिडकीत डोकं घालत म्हणाला, “साहबजी आप उस गाडीमे बैठीये तो”
“क्यू?..क्या हुवा?”
“कूच नही साहब थोडा गाडीका प्रोब्लेम हे”
जीवावर आल्यासारखं मी उतरलो आणि त्याने सांगितलेल्या गाडीत जावून बसलो. परत तो त्या दुसऱ्या ड्रायव्हर च्या खिडकीत मान घालत जोरात बोलला कि, “साहब से सिर्फ ढायीसो हि लेना हे भला क्या” आणि मग माझ्या कडे बघत म्हणाला कि, “चलिये साहब हो गया काम”.
मग हि दुसरी गाडी निघाली दादर कडे. वाटलं कि बर झाला त्याने गाडीत नाही बसवून ठेवलं, रिपेयर करतांना. भला माणूस वाटला तो. 2-4 मिनिटांनी मी ह्या नवीन ड्रायव्हरला (हा पण बिहारीच वाटत होता.. असो)  विचारलं कि, “भैय्या क्या हुवा उसके गाडी को”
“कूच भी तो नाही साहब” 
काय..? च्यायला असं कसं, मला तर काहीच कळलं नाही.    
“तो ऐसे हि गाडी क्यू बदली”
“साहब एक बात बोलू, आपको गुस्सा तो नाही आयेगा?”
“नही यार, बोलो”
“आपको उल्लू बनाया उसने”
उल्लू...मला...हे ऐकून तर मी चकितच झालो. मला काही कळायलाच तयार नाही कि हा असं का बोलला म्हणून.
“उल्लू,… कैसे यार, उसने जितना बोला उतना हि तो तुम्हे देना है, तो?”
यावर तो थोडा हसला, आणि पुढे बोलू लागला. त्याचा आत्मविश्वास थोडा वाढल्या सारखा वाटत होता, कारण दुसऱ्याने काय चुकी केली आहे हे सांगण्यापेक्षा दुसर सोप काम काय असणार..असो.
“सुनिये साहब, एयर पोर्ट से हायवे तक आने के लिये कितना टाईम लगा आपको, जरा बतायीये”
“सिर्फ 2 मिनिट”
“हा... तो उस दो मिनिट के उसने आपसे 100 रुपये लिये, आपको पता है?”
मला तर काहीच कळेना, मी त्याच्या कडे बघतच राहिलो. वाटलं तो इतका भला माणूस वाटला, त्याच्या बद्दल असं कसं बोलतो आहे हा.  
“साहब, देखिये एयर पोर्ट से दादर स्टेशन तक अगर आप मीटर से गये तो आपको 80 से 100 रुपये लगते हे, उसने आप को बोला कि 250, बराबर”
“हा यार”
“अब हायवे पार आते हि उसने हमको रोका, और हुमसे 100 रुपये मांगे, बोला कि ढायीसो  कि सवारी है दादर तक लेके जाव”
मी अजूनही त्याच्याच कडे बघत होतो.
“अब उसको सौ रुपये देनेके बाद भी हमे देडसो मिलने वाले हे, जो हमारे लिये फायदा हि हे न, क्यू कि मीटर से तो ज्यादासे ज्यादा सौ हि होता हे”
त्याची आणखी काही बोलायची गरज नव्हती, मला कळून चुकलं होतं काय ते.
“मुझे पता नही था यार, ऐसा भी करते हे लोग”
“अरे साहब, ये दलाल लोग होते हि हे हरामखोर जातके, दिन भर ऐसा हि काम करते हे ये. अगर आप बोलेंगे कि मीटर से चलो तो चेहरा उतर जाता है सालो का”
च्यामायला अगदी बरोबर बोलत होता तो..धन्य..! आणि पहिल्यांदा कोण्या एका बिहारीला दुसऱ्या बिहारीला शिव्या देतांना ऐकलं मी.
“उनको काम करणे कि तो इच्छा होती नही, फोकट का चाहिये होता हे सब, दिन भर ऐसे हि काम करते हे साले. उधरसे किसी को फसानेका ज्यादा पैसे मे, मिठी मिठी बाते करके, यहा आकार दुसरी गाडीमे बिठानेका...जो मीटर से जाते हे... और कमिशन लेके वापस”
मी ऐकतच होतो, आणि आता कुठे मला “अरे साहबजी आपसे थोडीही ज्यादा लेंगे” “चलिये साहब हो गया काम” ह्या वाक्यांचा अर्थ समजला.
“तो तुम क्यू नही रहते वहा पर”
“अरे साहब ये लोग हमे रुकने कहा देते हे वहा पर, उनका धंदा जो चौपट हो जायेगा, सब दलाल भरे हे उधर,”  आणि आणखी २-४ शिव्या हासडल्या.  मग तो जरा आणखी जोश मद्धे आला आणि बोलू लागला,
“हमे किसीका फोकट का पैसा नाही चाहिये साहब, दिन रात मेहनत करके जितना मिलता है, उतना काफी हे हमे. सारा मुंबई घुमते हे हम....” 
असं तसं खूप काही बोलला. असच एकाने 200 ऐवजी 800 घेतल्याचा किस्सा सांगितला. मला जस बोलला ना तो, कि तुम्हाला वेड्यात काढलं, तसच त्या जोडप्यातील यजमानाला पण म्हणाला. त्याच्या बायकोने फार झापला म्हणे त्याला. असे २-४ किस्से सांगून दिले त्याने एका दमात..मजा आली.  दादर कधी आलं कळलंच नाही.
उतरता उतरता तो मला म्हणाला कि, “साहब अग्ली बार थोडी दूर से गाडी पकडीयेगा, बहुत फायदा होगा आपका”

अगदी बरोबर बोलत होता तो, खर तर मी या गोष्टींकडे जास्त लक्ष देत नव्हतो. पण त्या दिवसा पासून थोडा विचार करायला लागलो. केव्हडा फरक होता त्या दोघान्मद्धे. त्या पहिल्या बिहारिने गोड बोलून बोलून वेड्यात काढलं, आणि हा दुसरा जरा अवघड शब्दात चांगल्या गोष्टी सांगून गेला. मला वाटायचं कि बिहारी म्हणजे सगळे एक सारखे असतील. पण त्या दिवशी कळलं कि ते पण दोन वेगवेगळ्या टायीपचे असू शकतात.

2 comments:

  1. Sahi hai...good experience :)

    ReplyDelete
  2. Haa tarr mazhyaa Lagnachya velechaa kissa aahe.. :)

    ReplyDelete