Monday, August 8, 2011

एक वर्ष पूर्ण...
माझ्या ब्लॉग ला एक वर्ष पूर्ण झालं. खर तर मागच्याच महिन्यात झालं पण यार ह्या २ महिन्यात फार व्यस्त होतो..कामात म्हणा कि इतर टायीम पास गोष्टींमध्ये म्हणा..पण होतो बिझी. त्या मुळे इथे एक वर्ष पूर्ण झाल्याची पोस्ट पण नाही टाकता आली हो. आता परत गाडी रुळावर आली आहे म्हणून छान वाटतंय. खूप विषय साचलेत मनात..आता लवकरच लिहायला सुरुवात करेन. पण त्या आधी  तुम्हा सगळ्यांचा आभार... :)

मी जे काही लिहील ते तुम्ही वाचलंत... कसही असली तरी... म्हणून इथ पर्यंत पोहोचू शकलो. इतर ब्लॉग मित्रांचे लिखाण वाचून फार आनंद वाटतो..खूप मस्त लिहितात सगळे आणि खूप वेगवेगळ्या विषयांवर. मी पण असाच प्रयत्न करणार. लिहिता लिहिता काही कविता पण केल्या त्याला पण तुम्ही दाद दिलीत. मला नव्हतं माहित कि मी पण कधी कविता करेन. पण ते आपोआप घडत गेलं. ते म्हणतात न कि पहिला पाऊल टाकणं फार महत्वाचं असतं...तसाच काही अनुभव आला. असो.. हि पोस्ट इतर पोस्ट सारखी मोठी नाही लिहित :)

हा परिचय असाच राहू द्या आणि तुमची अशीच साथ असू द्या बाकी काही नको. धन्यवाद...!!!  :)

Saturday, May 28, 2011

बातम्या...माहितीदायक कि त्रासदायक?

काल असाच टीव्ही बघत असतांना मराठी बातम्या लागल्या. फार दिवसांनी वाटलं कि बघाव्यात मराठी बातम्या, तेव्हडच काय चालू आहे महाराष्ट्रात,खेड्या पाड्यात.,.. ते तर कळेल.

सध्या बातम्या देतांना एक नवीन फ्याड सुरु झालंय. ते म्हणजे बातम्या सांगतांना तो बातमीदार त्याच पूर्ण ऑफिस भर फिरत असतो. मग आपल्याला सगळं व्यवस्थित दिसत कि कोण काय करत आहे म्हणून. खर तर ह्या वेळी सगळ्यांना खास सूचनाच दिल्या जात असतील कि, बातम्या देतांना तरी काम करा :) म्हणून सगळे शांतपणे काम करतांना दिसतात. जो बातमीदार असतो तो आपली कशाशी टक्कर न होवो याचाच जास्त विचार करत असतो, कारण साधारण माणूसच न तो एका वेळी २-२ काम कशी करणार. सगळं त्याच्या त्याच्या घाबरट हालचालींवरून सरळ सरळ दिसतं, नेहमी न चुकता बातम्या देणारे सुद्धा चुकायला लागतात...असो.

तर मग बातम्या सुरु झाल्या..
पहिली बातमी..हि होती एका मुली बद्दल..बिचारी कर्क रोगाच्या च्या चौथ्या स्टेज मध्ये होती पण तिला उपचार देतील असा एक पण दवाखाना मिळत नव्हता. खर तर कर्क रोगाच्या च्या तिसऱ्या स्टेज पासून गोळ्या औषधे फुकट मिळतात, तश्या जाहिराती पण आपण टीव्ही वर बघितल्या असतील. ती नागपूर ला आली उपचारासाठी, पण तिथले डॉक्टर म्हणाले कि हि आमच्या एरिया मधली केस नाही (दुसरी अपेक्षा काय करणार यांच्या कडून). तिथल्या हेड डॉक्टर ला विचारले असता तो म्हणतो कि अजून चौथ्या स्टेज मधल्या पेशंटवर उपचार करायची ट्रेनिंग अजून नाही मिळाली सगळ्यांना. तिने इच्छा मरणा साठी राष्ट्रपतींकडे अर्ज पण केला आहे (दुसरा ऑप्शन काही नाहीच उरणार कारण सगळे हात वर करणारे आहेत आपल्या कडे). बिचारी.. तरुण वयात इच्छा मरण मागतेय, या पेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणतीच नसणार.
पहिली बातमी पाहूनच पुढे पाहण्याची इच्छा संपली. पण बसलो तसाच.  

दुसरी बातमी.. हि होती एका लहान मुलाबद्दल. बिचारा...१०-१२ वर्षाचा असेल तो, काही श्लोक म्हणत बसला होता. पण...हे श्लोक काही देवाच्या स्तुतीपर नव्हते तर मृत शरीरास दफन करतांना म्हणावयाचे श्लोक होते. त्याचे वडील एका स्मशान भूमी मध्ये पुरोहिताच काम करायचे. म्हणजे मृत शरीरास काही ठराविक विधी प्रमाणे दफन करतात ना, तो विधी ते पार पाडायचे. त्याचं नुकतंच निधन झालं. मग आता घर कारभार..? घरात हा एव्हडाच पुरुष आणि मग त्याच्या बहिणी आणि आई. त्याला हे काम करण्या वाचून काही दुसरा मार्ग नव्हता. फार वायीट वाटलं त्याच्या कडे पाहून. ज्या वयात क्रिकेटची ब्याट घेऊन मुलं गल्लो गल्ली फिरतात त्या वयात हा लहान मुलगा मयत पुरण्यासाठी स्मशानभूमीत जागा शोधत होता.  काय बोलू मी यावर...देव त्या लहान मुलास खूप खूप शक्ती देवो.
तर अशी होती हि दुसरी बातमी, काय विचार करून बातम्या पाहायला बसलो आणि...असो.
   
तिसरी बातमी...ते असं म्हणतात ना कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. खरच आहे गाय नाही मरत पण त्या कावळ्याने एका एरिया मधली वीज ९ तास गायब करून टाकली होती. तर बातमी अशी होती कि, एक कावळा विजेच्या तारेत अडकून मेला होता. तर तिथल्या लोकांनी लवकरच तक्रार केली. पण आपल्याला माहीतच असणार ते आलेत कि नाही, म्हणून ते नाही लिहित. तिथे एका घरात लग्न होतं, तिथल्या एका महिलेस वीज गेल्या नंतर झालेल्या त्रासा बद्दल विचारले असता, ती तर फार भडकलेली दिसली. ती म्हणाली, 'आमच्या घरी भाच्याचं लग्न होतं, सगळे पाहुणे बिना आंघोळीचे गेले. तिथे त्या ऑफिस मध्ये कधी कुणीच नसतं, कुणी नसलं तरी सगळे पंखे चालू असतात'..असं तसं खूप बोलल्या त्या. आणि बोलणार नाही तर काय करणार. एव्हडच तर करू शकतो आपण, सगळं जर करू शकत असतो तर तो कावळा त्यांनीच काढून टाकला असता...असो. तर मग वीज कंपनीतील अधिकाऱ्यास याबद्दल विचारले असता तो काय म्हणाला, तो म्हणे कि तिथल्या गल्ल्या सगळ्या छोट्या छोट्या आहेत, आम्हाला तिथे तो कावळा सापडलाच नाही (हे भगवान... वाचव रे). बर झालं हा असं नाही बोलला कि आमच्या इथे कावळा काढण्याची ट्रेनिंग नाही दिली म्हणून..तेव्हडच आपलं भाग्य.  

मी पण काय इथे तुम्हाला बातम्या सांगत बसलो. चांगलंच बोर झालं असणार तुम्हाला. बातम्या आपण बघतो काही तरी कळेल म्हणून कि काय चालू आहे आपल्या राज्यात. पण यार ह्या बातम्या बघितल्यावर फारच टेन्शन वाढलं. ज्या लोकांबरोबर हे सगळं घडत असेल, ते बिचारे...आपण चानेल बदलून पळून जाऊ शकतो. पण त्याचं काय?...अवघडच होत असणार. कुठे त्यांच्या बातमीच प्रक्षेपण चालू असो किव्वा नसो, ते लढतच असतील तिथे....

बातम्या संपल्यावर मला कळलंच नाही कि ह्या किती माहितीदायक, (खरी परिस्थिती दाखवणाऱ्या) होत्या कि भयंकर त्रास दायक (खरी परिस्थिती दाखवल्या मुळेच) होत्या ?Wednesday, May 11, 2011

" खरच..हा तुझाच खेळ सये.."


"  भिजतो मी एकटाच पावसात 
समजून तुझीच आहे साथ...
मनात चिंब भिजलेली तू, 
आणि तुझा मी धरलाय हात…
मन माझे तुझ्या ओल्या अधरांवरील थेंब बनू पाहे…
खरच..हा तुझाच खेळ सये.."

"  नेहमीचा आहे रस्ता, 
तरी पण माझी चुकते वाट…
मध्य रात्री माझे उठणे, 
समजून कि आता झाली पहाट…
प्रत्येक स्वप्नात असते तुझे येणे जाणे…
खरच..हा तुझाच खेळ सये.."

"  फिरवतो फुलांवरून हळुवार हात समजून तुझे सुकोमल गोरे गाल...
असतो मी कायम सरवान्म्द्धे,  
पण कधी हरवतो कुठे कुणी न जाणे...
तासंतास बघत असतो शांत निळ्या नभाकडे…
खरच..हा तुझाच खेळ सये.."        Tuesday, April 5, 2011

" एक नाजूक कळी जाईची..."

                                                 " रंग तिचा शुभ्र विजेरी..
                                                      कुठे कुठे हलका गुलाबी..
                                                  स्पर्श तिचा अगदीच कोमल..
                                                      जसा नेसला शालू मखमली..
                                                  अशी हि नाजूक कळी जाईची.."

                                                 " छेडतो तिला खट्याळ वारा..
                                                      उघडण्या रुपाची तिजोरी..
                                                   वाट पाहतात भवरे शेकडो..
                                                       बघण्या झलक उमलत्या देहाची..
                                                  अशी हि नाजूक कळी जाईची.."

                                                  " आणून मुखी मृदू स्मित..
                                                       खुलवते रूप पूर्ण देखणी.
                                                    टाकते सुगंधी पाश..
                                                        करते ती मुग्ध दिशा दाही..
                                                   अशी 
हि नाजूक कळी जाईची.."
Monday, March 21, 2011

' किस्सा रेल्वे क्रॉसिंगचा 'चांगल्या चांगल्या लोकांना पळवायला लावणारी गोष्ट म्हणजे लोकल ट्रेन. कधी कधी किती काकूंना साडी धरू कि लोकल धरू अश्या अवस्थेत पाहिलं आहेरेल्वे क्रॉसिंग वरून ह्या गोष्टी व्यवस्थित दिसतात कारण तिथे ते फाटक उघडल्या शिवाय काहीच करता येत नाही. तो पर्यंत काय, तर मग शांत उभं राहणं आणि अशी लोकांची गम्मत पाहत बसणं. रेल्वे क्रॉसिंगला दोन्ही बाजूला जागा असते पायी चालणाऱ्या लोकांना क्रॉस करण्यासाठी. कोणतीही व्हीलर जाण्यास फारच त्रास होयील तिथून. मध्ये लोखंडी फाटक असते आणि त्याच्या मधो मध लाल सिग्नल. तर मग या फाटका जवळ म्हणजे रेल्वे क्रॉसिंग जवळ मी पाहिलेले - किस्से आता तुम्हाला सांगतो.    लोकल आली कि आजू बाजू जरा गोंधळाच वातावरण तयार होतं, कारण लगेचच निघते न ती. तर मग त्या दिवशी लोकल आली, जे थोडे दूर असतात होते त्यांनी लगेचच पळायला सुरुवात केली. असंच एक जोडपं (नक्की नाही..पण आता पुरतं कपलच समजू) थोडं घायीत दिसलं. मध्ये ते फाटक होतं. तो मुलगा पटकन थोडा खाली वाकून फाटका खालून निघून फलाटावर पोहोचला. तो खालून जाता जाता ओरडत होता कि खालून ये खालून ये म्हणून. पण त्याच्या बरोबरची मुलगी...? ती खालून न जाता सायीडला गेली आणि तिथून यु टर्न मारून पुढे निघाली. फारच ताट मानेने जगणारी मुलगी असेल हि, कुठेच मान नाही वाकवणार वाटत. तो बिचारा तिथे त्या डब्ब्यासमोर जाऊन उभा होता, आणि जोर जोरात हात वारे करत होता तिला कि लवकर ये म्हणून. बाई साहेबांनी प्लेटफॉर्म च्या पायऱ्या चढल्या चढल्या लगेचच गाडीचा भोंगा वाजला. लोकल ला काय - सेकंदात स्पीड घेते ती, ह्या बयाने - पाउल टाकले टाकले लोकल निघाली सुसाट. बिचारा तो मुलगा घडी घडी कधी तिच्या कडे तर कधी ट्रेन कडे बघत होता. लोकल सुटल्याचा हताशपणा त्याच्या चेहऱ्यावर सहजच दिसून आला. कारण त्याला माहित असावं कि आता तास लोकल नाहीच म्हणून. आणि हि बया असे हावभाव दाखवत होती कि ते जणू दादर वगैरे ला कुठे तरी उभे आहेत जिथे दर मिनिटाला लोकल येते म्हणजे येतेच. असे हाव भाव दाखवणे तिला गरजेचेच होते, कारण तिला माहित होते कि थोडी मान वाकवली असती तर ट्रेन सापडली असती. आता बसतील दोघे तास टायिम पास करत (ती बया बहुतेक ताट मान करूनच बसली असणार :))  

दुसरा किस्सा- ट्रेन आली प्लेटफोर्म वर. मग आमच्या मागून एक मुलगी पळत पळत आली. मला वाटलं कि पटकन खालून निघून गेली तर मिळून जायील ट्रेन हिलापण हि त्या वरच्या मुलीचीच बहिण वाटली, बाईसाहेब इतकी घाई असतांना सुद्धा वाकल्या नाहीतच. क्रॉसिंग च्या कोपरयाने त्या अवघड जागेतूनच पुढे गेल्या...धन्य आहे...नमस्कार यांना. इकडे भोंगा वाजला पण. ह्या बयाची हायीट म्हणजे हि हात देऊन ट्रेन थांबवायला लागली. घ्या आता हि काय टम टम ( व्हीलर) आहे कि जी हाताचा किव्वा शिट्टीचा इशारा होताच डिस्क ब्रेक असल्यागत लगेच थांबते. तर नाही हि आहे लोकल ट्रेन, निघाली ती निघाली. बिचारीला कसच झाला वाटतं, मग ट्रेन गेली तिकडे हि पण चालत गेली, मान खाली घालून :).

आता पुढचा किसा हा वरच्या दोन्ही किस्स्यांच्या अगदी उलट आहे. म्हणजे घाई नसतांना घाई केली तर काय होयील याचा उत्तम उदाहरण. ते कसं आहे कि तुम्ही निघालात कुठे तरी तर मग मधेच हा असा रेल्वे क्रॉसिंग पाहून थोडा जीवावर येतं. फालतू टायिम पास होयील असं वाटतं. मग एकाची वेळ वाचवण्याच्या नादात बरीच फजिती झाली. ते असं कि मी क्रॉसिंग जवळ पोहोचायच्या अगदी पहिलेच सिग्नल लागला. आता मला लोकल चा टायिम माहित असल्याने हा सिग्नल लोकलचा नसून कोणती तरी फास्ट ट्रेन इथून जाणार म्हणून लागला आहे हे कळून चुकलं होतं. मग मी गाडी बंद करून समोर बघायला लागलो. पलीकडच्या क्रॉसिंग समोर पण थोड्या गाड्या जमल्या होत्या. तिथे एक महाशय आले. त्यांनी दुरूनच बघितलं असावं कि सिग्नल आताच लागला म्हणून. बहुतेक त्यांना फार घाई होती आणि रेल्वे क्रॉस होण्यास थोडा वेळ पण असल्याने त्यांनी खालून जाण्याच्या प्रयत्न सुरु केलाते गाडीवरून डाव्या बाजूला उतरले. त्यांनी गाडी थोडी तिरपी केली, ते पण वाकले आणि गाडी पुढे नेण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागले. आता सरळ असलेली गाडी पण पुढे ढकलण्यास कधी कधी जीवावर येतं आणि त्यातल्या त्यात तिरपी गाडी आपण किती वेळ धरू शकू? फारच अवघड असं काम आहे. आता ह्या गोष्टी समोरच्या व्यक्तीला नक्कीच ठाऊक असणार तरीही तो जे काही दिव्य करत होता त्याला खरच नमस्कार !

तर मग तिरपी गाडी आणि तोही कमरेत वाकलेला, अश्या अवघड अवस्थेत त्याला ती गाडी पुढे काही ढकलता येयीना. त्याने गाडी सरळ केली. मला वाटलं कि नाद सोडला याने. पण नाही हो, महाशय गाडीवर बसले आणि आता उजव्या बाजूने उतरले. आई शप्पथ...डेंजर माणूस दिसतोय..! परत तिकडून पण त्याने तसाच निष्फळ प्रयत्न केला (निष्फळ म्हणजे त्याला हे कृती केल्या नंतर कळलं). काही जमेना म्हणून परत त्याने गाडी सरळ केली आणि गाडीवर बसला.

क्रॉसिंग वर उभा असलेला प्रत्येक व्यक्ती हा फक्त त्या सिग्नल कडे बघत असतो. म्हणजे कधी हे फाटक वर जायील आणि मी इथून गाडी काढेन असं झालेलं असतं. पण आज सगळ्याचं लक्ष त्या महामानवा कडे लागून होतं आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर असलेलं हसू मला पलीकडूनही दिसत होतं. तो जरा घामेघूम झाला होता. त्याने रुमाल काढला आणि घाम पुसला. मला वाटलं झाला शांत हा. पण अहो थांबा..पिच्चर अभी बाकी ही मेरे दोस्त..!  तो परत डाव्या बाजूला उतरला, आणि जिथून ह्या वरच्या ताट मान असलेल्या मुली गेल्या ना तिकडे गाडी ढकलत नेऊ लागला.  (च्यायला...पागलबीगल झाला का हा..!)  वाटलं हे जरा जास्तच करतो आहे हा माणूस (इंजिनियर असावा :)). त्या इतक्याश्या जागेतून कशी काय गाडी घालणार हा असा विचारच करवत नव्हता. नुसती गम्मत पाहण्या पलीकडे दुसरं काही करू शकत नव्हतो (खर तर आता उत्सुकता लागली होती कि साहेब काय आयटम देतात ते). त्याने गाडी त्या यु टर्न मध्ये टाकली आणि त्याने परत....खेळ मांडला....मांडला. तो गाडी पुढे ढकलायचा, त्याच्या कडे जीव काढून ओढायचा, परत तिरपी करून पुढे ढकलायचा. त्या छोट्याश्या जागेत हा खेळ खूप वेळ खेळत होता तो. तिथे जमलेले  लोकं तर कुणीतरी डोम्बारयाचा खेळ दाखवत आहे इतकं मन लावून त्याच्या एक एक कृती कडे बघत होतेबहुतेक त्याचं लोकांकडे अजिबात लक्ष नव्हतं (लक्ष असतं तर कधीचाच थांबला असता :)) असो. मला माहित नाही हे कसं झालं, पण यार...त्याने काढली हो गाडी तिथून (खरच..टाळ्या..!) मानलं बुवा त्याला. पण आता गाडीचा भोंगा ऐकू यायला लागला. त्याने पटकन गाडी चालू करून रेल्वे लायीन क्रॉस केलीचला एव्हडा तरी आनंद कि गाडी क्रॉस होण्या पहिले याने रेल्वेलायीन क्रॉस केली.

एक गोष्ट मी तुम्हाला पहिलेच सांगायला हवी होती कि, माझ्या समोर जे क्रॉसिंगचं फाटक होतं त्याच्या दोन्ही बाजूला सगळ बंद होतं, म्हणजे ताट मानेच्या लोकांना इथे मान खालीच घालावी लागणार होती. दूसरा पर्याय नाहीच. आता हे त्या महामानवाला आधीच माहित असतं तर त्याने इतके कष्ट घेतले नसते. असो. तर मग रेल्वे गेली आणि आता १ मिनिटाच्या आता फाटक उघडणार होतं. याने इकडे तिकडे बघितलं, त्याला कळून चुकलं कि आता पुढे जाणं खरच अवघड दिसतंय (आरती करा याची..). त्याने गाडी बाजूला लावली आणि शांत उभा राहिला. सगळे त्याच्याच कडे बघत होते. बिचारा इतकं सगळं केलं त्याने, पण आता हे फाटक उघडल्या शिवाय काही करू शकणार नव्हता. म्हणजे इतकं करून फक्त ४-५ सेकंद वाचवले होते त्याने (हुर्रेSSSSS). फाटक उघडलं आणि सगळे बरोबरच निघाले.
इतकं तर नक्की आहे तो परत असं कधीच करणार नाही. पहिले रेल्वेला तिचा तिचा मान देयील आणि मगच पुढे जायील. 

आपल्याला नाही कधी इतकी घाई करायची, ३-४ मिनिट वाट पाहण्यात काहीच गैर नाही. ते पण अश्या धोक्याच्या ठिकाणी नको रे बाबा. 'दुर्घटना से दर भली'.