Saturday, December 25, 2010

" हा तुझा सुगंध..."

"  हा तुझा सुगंध...मज करतो धुंद… हा तुझा सुगंध..."


"  तू येता जवळ...(2)
मिटुनी डोळे रोमारोमात भरण्याचा जडला मज छंद…हा तुझा सुगंध..."


"  उभारती तनावर आनंदाचे शहारे...(2)
अन उठवती मनात लाखो तरंग..हा तुझा सुगंध..."


"  पडतात शब्द तोडके...(2)
इतका मनास माझ्या देतो अवर्णनीय आनंद…हा तुझा सुगंध..."


"  नेतो मज सातव्या अस्मानी...(2)
जिथे दिसते तीच आणखी कुणी नको असते मज संग... हा तुझा सुगंध..."


"  भूलववितो जगाला…(2)
विसरववूनी माझं मला, जसा आनंदात जळणारा पतंग…हा तुझा सुगंध..."No comments:

Post a Comment