Sunday, December 26, 2010

" फक्त तूच आहेस साक्षी…"


" जसा पाहत असतो चातक वाट ऋतू वर्षाची..
तशी मला कायम असायची आस तुझ्या चाहुलीची..
त्या माझ्यातल्या विलक्षन अधिरतेची….फक्त तूच आहेस साक्षी…"

" सहवास तुझा लाभावा म्हणून माझं नाटक करणं..
येत असून सुद्धा स्वतःला अबोध अस भासवणं
तू समजावणाऱ्या त्या माझ्यातल्या उत्कृष्ट कलाकाराचीफक्त तूच आहेस साक्षी…"

" तू प्रेमाने समजवावं म्हणून माझा रुसणं
तुझ्याकडे पाठ फिरवत डोळ्यांच्या किनारयाने तुजकडे बघणं
तू लाडाने कुरवाळनाऱ्या त्या माझ्यातल्या खुळेपणाची... फक्त तूच आहेस साक्षी…"

" मला पडलेले स्वप्न तुला बोलून दाखवणं..
आणि तुझ मला ते स्वप्न रंगवण्यात मदत करणं..
तूलाही मदहोश करून टाकणाऱ्या, त्या माझ्या श्रीमंत स्वप्नांची...फक्त तूच आहेस साक्षी…"

"' अवघड आहे आपलं मिलन' अस तुझ मुद्दामून बोलणं..
सुन्न मना काही सुचेना म्हणून माझ शून्यात बघणं..
त्या माझ्यातल्या ओसाड नजरेची...फक्त तूच आहेस साक्षी…"

" व्हायचे असह्य विचार, तुझ्या पासून दूर नेणारे
घडी घडी प्रत्तेक क्षणी त्या कारणे मन माझे रडायचे
तुझ्या कुशीत रडणाऱ्या त्या माझ्यातल्या लहान बालकाचीफक्त तूच आहेस साक्षी…"

" आले होते डोळे भरून, होतांना तुज पासून कायमचे दूर
होते कारण तुलाही माहित.. कारणकारण होती अवस्था तुझीही तीच
विरहाच्या त्या माझ्यातल्या अंतिम असह्य अश्रूंची….फक्त तूच आहेस साक्षीफक्त तूच आहेस साक्षी"

Saturday, December 25, 2010

" हा तुझा सुगंध..."

"  हा तुझा सुगंध...मज करतो धुंद… हा तुझा सुगंध..."


"  तू येता जवळ...(2)
मिटुनी डोळे रोमारोमात भरण्याचा जडला मज छंद…हा तुझा सुगंध..."


"  उभारती तनावर आनंदाचे शहारे...(2)
अन उठवती मनात लाखो तरंग..हा तुझा सुगंध..."


"  पडतात शब्द तोडके...(2)
इतका मनास माझ्या देतो अवर्णनीय आनंद…हा तुझा सुगंध..."


"  नेतो मज सातव्या अस्मानी...(2)
जिथे दिसते तीच आणखी कुणी नको असते मज संग... हा तुझा सुगंध..."


"  भूलववितो जगाला…(2)
विसरववूनी माझं मला, जसा आनंदात जळणारा पतंग…हा तुझा सुगंध..."


Thursday, December 16, 2010

" मना माझ्या घे भरारी..."


“ मना वाटते घ्यावी उडी,
त्या निळ्या खोल समुद्रातळी,
जिथली स्तब्द शांतता,
देखिली नाही अजून कुणी  …”

“ मना वाटते बनावे,
नाजुकसे दव पहाटचे,
ज्याची काही क्षणाची सुंदरता,
लाभली कुणाला…”

“ मना माझ्या हवे,
उत्तुंग आकाश आनंदाचे,
जिथे करू पाहिल विहार स्वच्छंद,
जिथे भय नाही कुणाचे…” 

“ मना वाटते बरसावे,
बनुनी घन प्रेमाचे,
घेऊन टाकावे मिठीत,
मला हवे जे सारे…”

“ मना माझ्या घे भरारी,
शोध वाट नव्या विश्वाची,
टाक तोडून  बंधन सगळे,
तुटता तुटले जे कुणाच्याही…”