Monday, November 22, 2010

" मज वाटतो हेवा..."


"मज वाटतो हेवा.. त्या फुलांचा,
ज्यांना करते ती नाजूक स्पर्श आणि भरते  रोमारोमात त्यांचा सुगंध",

"मज वाटतो हेवा.. त्या वाऱ्याचा,
जो कधीही तिच्याशी खेळू शकतो, नकळत तिच्या सवे कायम राहता",

"मज वाटतो हेवा.. त्या थेंबांचा,
जे गालांवरून सरकत जावून, करतात स्पर्श तिच्या नाजूक अधरांना "

"मज वाटतो हेवा.. त्या रेशीम धाग्यांचा,
जे बनून सुंदर वस्त्र, तीच मनमोहक रूप आणखी खुलवतात",

"मज वाटतो हेवा.. त्या पाऊल वाटांचा,
ज्या वर तिचे नाजूक पाऊल पडताच त्या तिच्याच सवे चालू लागतात",

"मज वाटतो हेवा.. त्या जल धारांचा,
ज्या तिच्यावर मनसोक्त बरसून त्या कोमल देहास घट्ट मिठीत घेतात",

"मज वाटतो हेवा.. त्या शय्येचा,
जो तिच्या नाजूक कायेस देतो आधार, प्रेमाने कुरवाळता",

"मज वाटतो हेवा.. त्या क्षणांचा,
जे तिच्या मुखावर आणून हसू तिच्या गालान्वरची खळी खुलवतात",

"मज वाटतो हेवा.. त्या अश्रूंचा,
जे तिच्या डोळ्यात कायम राहून, कधी तिच्या नाजूक पापण्यांतून हळूच ओघळतात", 

" मज वाटतो हेवा.. त्या स्पर्शाचा,
जो होताच, अंगावर माझ्या क्षणात लाखो शहारे आणतात"


2 comments:

  1. Hey Kharach Khup mast aahe.. :)

    ReplyDelete
  2. Sahi re…kharach khupch chan lihali aahe kavita…….
    Aasach lihat raha J

    ReplyDelete