Tuesday, November 9, 2010

मज आठवते ती…

कधी कधी तो शांत बसला असतांना त्याला अचानक तिची आठवण येते. कुठून येते, कशी येते त्यालाच कळत नाही. मग त्याचं मन जातं भूतकाळात निघून, लगेच त्याचं क्षणी. लगेच तो वेगळा होवून जातो, म्हणजे त्याच्या मनाची दशा आपोआप बदलते. गर्दीत जरी असला तरी तिची एक आठवण पुरे आहे…त्याला दुसऱ्या विश्वात नेण्यासाठी. तो तिला विसरला आहे (असं त्याला वाटतं) तरी पण अश्या किती तरी गोष्टी आहेत कि ज्यामुळे त्याला तिची आठवण येऊन जाते. आता इथे प्रश्न हा आहे कि, काही गोष्टी पाहिल्या वर अनुभवल्या वर त्याला तिची आठवण येते कि, त्या त्या गोष्टीत..अनुभवात तो तिला स्वतःहून शोधत असतो? याच उत्तर त्यालाही नाही माहित. म्हणतात ना “दृष्टी तशी सृष्टी”. मग जर का त्याच्या दृष्टीतच ती असेल तर मग सृष्टीत तिच्याहून वेगळं काय दिसणार. 

कोणत्याही स्थळाची किव्वा विशिष्ट अश्या क्षणाची गरज नाही… तिच्या आठवणीसाठी. तो म्हणतो….. 

मज आठवते ती…

"  कधी खिडकीच्या झरोक्यात अन कधी पावसाच्या धारात..मज आठवते ती…


कधी नदी किनारी, कोवळ्या लहरीत... मज आठवते ती….


कधी सांज ढलतांना अन क्षितिजाकडे पाहतांना ...मज आठवते ती….


कधी हिरव्या रानात, लाल पिवळ्या फुलात...मज आठवती ती…


प्रेमळ रागात अन पाण्याच्या टपोऱ्या थेंबात... मज आठवते ती…


गालावरच्या देखण्या खळीत अन कधी उमलत्या कोमल कळीत... मज आठवते ती…


कधी असता दूर देशी, कधी एकांत वासी... मज आठवते ती….


निखळ हास्यात अन कधी जाईच्या गंधात... मज आठवते ती….


चांदण्या राती अन कधी एकटे चालता पायवाटी... मज आठवते ती….


अवखळ झऱ्यात अन गार गार वाऱ्यात... मज आठवते ती…


धूसर धुक्यात अन संथ अश्या ओढ्यात...  मज आठवते ती…


निवांत असता झाडाखाली अन कधी हर्षित मनी... मज आठवते ती…


रंग बिरंगी रंगात अन कधी तळ्यातल्या तरंगात...  मज आठवते ती….


वाऱ्याने डोलणाऱ्या पिकात अन कधी पाण्यावर वाहत जाणाऱ्या पिंपळ पानात... मज आठवते ती…


जुन्या खाणा खुणीत अन क्षणाच्या प्रत्येक क्षणी ...  मज आठवते ती…."

6 comments:

 1. mast aahe re Chaan lihilaa aahes.. :) Keep it up !!!!

  ReplyDelete
 2. Bhari lihile ahes re… !!!
  Kon ahe mhane ti? ;)
  Nakkich konalatari dolyasamor anun lihile ahes tu…. Mhanunnach tu je lihile ahes te khup “jivant” watate !!!

  Baki, comments are blocked from here so couldn’t write anything L

  Asach lihit raha J

  ReplyDelete