Saturday, October 16, 2010

लहानपण...वेगळंच असतंआमचं घर म्हणजे एक रो हाउस आहे. एकूण 7 रो हाउस पैकी आमचं अगदी शेवटचं घर. शेवटचं असल्याने थोडी मोकळी जागा पण मिळाली आहे. घरा शेजारी म्हणजे डाव्या बाजूला एक छान, डेरेदार असं मोठं पिंपळाच झाड आहे. त्याच्या भोवताली गोल असा ओटा बांधलेला आहे मस्त सफेद फर्च्यांनी. कायम पणे तिथे थंड वातावरण असतं, सावलीहि भरपूर असते. बराच एकांत असतो, कारण आमचं घर सोडलं तर इतर घरे थोडेसे दूरच आहेत तिथून. 

तिथे दिवस भर लहान मुले काही काही खेळत असतात, आरडा ओरड करत असतात. मी पण कधी कधी त्या ओट्या वर जावून बसतो, मस्त वाटत एकदम. त्या मुलांची फार गम्मत चालू असते, एकमेकांना फार इमोशनल करत असतात ते आणि दुसरा होतो पण. त्यांचे डायलॉग पण भारी असतात, ते असे किमी तुझा मित्र आहे ना रे, मग माझ्या वर राज्य घेणार,.. मी नाही खेळत बाबा नेहमी मलाच आउट करतो हा,तू फार चिडतो खेळताना, आता बघ तुझ्या मम्मिलाच जावून सांगतो आम्ही …,  आणि कोणी लवकर आऊट झाला तर तो म्हणतो. माझी माझी bat द्या मी चाललो..., लगेचच त्याला परत batting देण्यात येते.

फारचसेंटी मारत असतात ते, पण thank god त्यांना हासेंटी शब्द माहित नाही आहे म्हणून. आज काल आपण लगेचच..'हा हा सेंटी नको मारूस माहित आहे आम्हाला तुझं नाटक', असं म्हणून मोकळे होतो. समोरचा बिचारा कोणत्या भावनेने बोलतो आहे याचा जास्त करून आपण विचारच नाही करत. म्हणून हे बर आहे कि ते मुलं अजून लहानच आहेत आणि ते ह्या शब्दांना अपरिचित आहेत, नाही तर काहीच मजा नाही उरणार त्यांच्या खेळण्यातअसो.

 ह्या त्यांच्या छोट्याश्या ग्राउंड जवळून एक रस्ता जातो, खर तर एक छोटीशी पाय वा आहे ती. तर हि पायवाट आमच्या घराजवळ येवून पुढे सरळ मोठ्या रस्त्याला लागते. दिवसा लोकांची बरीच रहदारी असते तिथे, कारण तिथून नाही गेलं तर फार फिरून पुढे जावं लागतमग त्या दिवशी मी सकाळी सकाळी उठलो आणि गच्चीत जावून शांत पणे उभा राहिलो. सकाळचे 7/7.15 तच  वाजले असल्याने परिसरात थोडीशी शांतता होती. छान असं थंडगार वारा वाहत होता. ह्या वाऱ्यामुळे त्या पिंपळाच्या झाडाची पाने हलत होती, सळ-सळ असा आवाज होत होता आणि काही पाने तुटून जावून त्या मोकळ्या जागेत पडत होती. सकाळच्या गार वाऱ्यात खरच एक वेगळीच एनर्जि असते जी आपलं मन अगदी प्रसन्न करून टाकते. आपल्या कडून आपोआप मोठा श्वास घेतलं जातो. मी पण मोठा श्वास घेतला 2-3 दा, छान वाटलं एकदम.

असच इकडे तिकडे बघत असतांना झाडाच्या पली कडून मला एक छोटासा मुलगा पळत येतांना दिसला. पळत म्हणजे असा हळू हळू पळत, लंगडी घालत उड्या मारत आणि काही तरी गुण गुणत. एकदम टिल्लू होता तो, म्हणजे अगदी दोन फुट उंचीचा असेल. त्याच्या अंगावर त्याच्या शाळेचा ड्रेस होता वाटत, म्हणजे छोटुसा सफेद शर्ट आणि हाफ खाकी चड्डी. केस छान विंचरलेले होते. त्याच्या दोन्ही हातात काही तरी वस्तू होत्या, डाव्या हातात दुधाच्या पिशवी सारखं काही तरी होतं, लांबून मला काही स्पष्ट दिसलं नव्हतं कि त्या काय वस्तू आहेत म्हणून. मी त्याच्याच कडे बघत होतो. एव्हाना तो टिल्लू झाडा जवळच्या पाय वाटेला लागला होता. आता कुठे त्याच्या हातातल्या त्या वस्तू मला दिसायला लागल्या. त्याच्या डाव्या हातात 1 छोटी दुधाची पिशवी होती आणि उजव्या हातात एक खारी चा पुडा. तो मस्त 'नु नु नुनु' असं गुणगुणत चालला होता, त्याच्याच धुंदीतत्याने आमच्या घरा जवळून वळण घेतलं आणि तसाच गुण गुणत पुढे गेला. मी तो नजरे आड होण्या पर्यंत त्याच्या कडेच बघत होतो. त्याला पाहून  माझ्या चेहऱ्यावर छोटीशी स्मायील  पसरली आणि विचार आला कि मस्त चहा खारीचा बेत आहे वाटत गडीचा आज, म्हणून तो टिल्लू इतका खुश दिसत होता.

तो निघून गेला होता पण माझ्या डोळ्या समोर तो अजूनही नाचतच होता. किती खुश होता तो टिल्लू, चहा खारी खायला मिळणार म्हणून, खरच लहानपणी किती लहान सहान गोष्टी मद्धे आपल्याला आनंद वाटायचा. तिथेच त्या भिंतीवर हाताचे दोन्ही कोपरे आणि गालावर दोन्ही हात ठेऊन, मी त्या पिंपळाच्या झाडाकडे बघत माझा भूत काळ आठवायला लागलो.एक एक करून जुन्या आठवणी समोर यायला लागल्यात. भूत काळ समोर यायला लागला, ते गल्लीत मोज्याच्या बाल वर क्रिकेट खेळणं. ते लाकडाच्या फळीला bat म्हणून वापरणं. तो विट्टी दांडूचा खेळ, विट्टी कोणती तर तेल संपलेली pyarashut ची बाटली. ती गोट्यांची ढाय, चांगल्या गोटीला हंटर बनवणे. ते रस्त्याच्या मध्ये अगदी छोटा गोल असा खड्डा करणे, गल म्हणूनसर सर सगळे क्षण डोळ्या समोरून जात होतेशाळेचा पहिला दिवस, ते नवीन कपडे, तो नव्या वह्यांचा सुगंध अजूनही मनात भरलेला. क्लास मद्धे उत्तर देण्यासाठी हात वर करणं, म्हणजे नेहमी तर उत्तर येत नसे, पण जेव्हा पण माहित असलं तर..तर गम्मतच विचारू नका...असो. ती शाळेतल्या मुलींबरोबर असलेली खुन्नस, त्याना चिडवणं.

मकर संक्रातीच्या दिवशीचा तो कहर. आमच्या एरिया मधली अशी एक पण गल्ली राहिली नसेल कि जिथे आम्ही पतंग पकडायला गेलो नसु. तो क्षण म्हणजे विजय एकदा पतंग पकडण्या साठी एका गेट वर चढला होता, लोखंडी टोकदार बाणे असलेला, उडी मारतांना त्याची pant फाटली होती आणि चांगलंच रक्त निघालं होतं. हरीचा ते हजार वेळेस मांजाने बोट कापण आणि जोर जोरात ओरडणं. खर तर त्या पतंगीण मुळेच कोणता रस्ता कुठे जातो आणि कोणत्या रस्त्याला मिळतो हा नकाशा आमचा पूर्ण पणे पाठ झाला होताहोळी साठी घरो घरी जावून वर्गणी गोळा करणं, आणि चौका चौकात जावून लाकडं गोळा करत फीरण. कधी कधी दुसऱ्या चौकातल्या होळीची लाकडं चोरून आणणं किव्वा त्यांची रचलेली होळी चोरी छुपे तोडून येणं, ती खुन्नस. रंगपंचमीला गल्लो गल्ली रंग बिरंगी भूत बनून फिरणं, चिखलात लोळणं आणि त्या रंगाचं 4-5 दिवस उतरणं.

थंडीच्या दिवसात रंनिंग करण्या साठी सकाळी लवकर उठणं आणि रनिंग च्या नावावर सासू गोळा करून कुठे तरी शेकोटी करत बसनं...ती उब अजूनही फिल होते. आईचं मेथीचे लाडू बनवणे आणि आमच ते आवडीने खाण. दिवाळीला आई वडलांबरोबर नवीन कपडे घ्यायला जाणं. घरी आल्या वर घडी घडी ते कपडे घालून बघणं… काय तो आनंद होता. याच विचारात भरपूर वेळ निघून गेलाजाग आल्या सारखं मी इकडे तिकडे बघितलं आणि घरात माझ्या रूम मद्धे गेलो.


काही क्षणातच सगळं काही डोळ्या समोरून पटापट निघून गेलं. तो भूत काळ त्यातले कोणतेही क्षण आठवले तरी चेहऱ्यावर नाजूक हास्य उमटते आणि आपण केलेल्या वेड्यापणा वर हसू येते. पण आठवणीत राहून वर्तमानात जगन कठीण असतं. आता..आता शाळा नाही कि नवीन वह्या नाहीत. आय टी मद्धे काम करतो म्हणून लिहायचं पण विसरलो कि काय असा वाटत कधी कधी. आई अजूनही लाडू बनवून देते पण खायचं लक्ष्यात राहत नाही. दर महिन्याला काही काही कपडे घेत असतो म्हणून दिवाळीच्या कपड्यांची इतकी क्रेझ नाही राहिलेली. खेळणं वगैरे तर दूरच राहिलं. आता जो सन शनिवारी किव्वा रविवारी येतो तोच कळतो, नाही तर फक्त वार लक्षात असतो, कारण कंपनीत फोर्मल्स कि केजुअल वारा वर असतं म्हणून. रात्री उशिरा झोपतो आणि सकाळी उशिरा उठतो, चहा खारीची मजा पिझ्झा मद्धे शोधतो. लहान पणी कमी खर्चात खूप मजा यायची आणि आता कुठे कुठे खूप खर्च करूनही असं वाटत कि वाया गेलेत म्हणून.

लहान होतो तेव्हा काही चूक झाली तर म्हणायचे कि जाऊदे रे लहान आहे तो आणि आता....आता काही चूक झाली तर म्हणतात कि काय रे चूक  करायला तू काय लहान आहे का? तेव्हा भरपूर चुका माफ होत असतात. ते दिवस वेगळेच होते, कारण आपल्यावर कसलीही जबाबदारी नव्हती. कधी कधी त्या आठवणी आल्यात तर अस वाटत कि आपलं लहानपण परत आपल्याला मिळाल तर किती मज्जा येयील, ज्या चुका झाल्यात त्या सुधरवू किव्वा जो वेडापणा करायचा राहिला तो करून येऊ. आता पूर्ण पणे  लहान होवून जगन केवळ अशक्यच आहे, कारण ते वय गेलं पणपण कधी तरी थोड्या वेळा करिता का होयीना लहान बनू शकतोच आपण. त्यात काहीच प्रोब्लेम नाही, खर तर खऱ्या माणसाची हीच तरी निशाणी आहे कि जो लहानानमद्धे लहान बनून राहतो. त्यातच खरा आनंद आहे.


जमल तर बनून बघा लहान...खेळून बघा एखादा खेळ... मज्जा वाटेल (कधी तरी बर कानेहमी नको). मला खात्री आहे कि तुमच्यापण लहानपणीच्या अश्याच काही गमतीदार आठवणी नक्कीच असतील . जरा शेअर केलं तर तुम्हाला पण आनंद होयील आणि मला पण.