Thursday, July 15, 2010

ये रे घना..ये रे घना.....न्हाऊ घाल माझ्या मना...


ये रे घना..ये रे घना.....न्हाऊ घाल माझ्या मना...
प्रत्येकाला पाण्यात भिजन्याची हौस नक्की असते. ह्या गोष्टीला काही अपवाद नक्कीच असतील पण ह्या वेळी त्यांचा विचार आपण सोडून देउ या (सर्वात प्रथम माझा थोरला भाऊ, पाण्यात भिजला की लगेचच त्याला सर्दी होते. म्हणून तो पावसात जान्याच पुर्णतः टाळतो...असो). वर ज्या गीताची ओळ मी लिहीलेली आहे, त्यात कवित्री आरती प्रभु म्हणतात की, घना तू ये आणि न्हाऊ घाल माझ्या मना. मनाला अंघोळ घालने, खरच किती कल्पना पलीकडला विचार. कवी मन हे असं असतं, अगदी थोड्या शब्दान्मद्धे मनाची स्थिती, चल बिचलता वर्णून टाकत...असो.

मग रोज सकाळी आपन अंघोळ करतो, पण ते फ़क्त आपल्या बाह्य शरीराला धुन्यासाठी. कारण सकाळी सकाळी आठवलं कि आज पण ऑफिस मद्धे काल सारखा ताण राहील, मग काय अंघोळ करून पण फ्रेश नाही वाटत. खर तर दिवसभर आपण जे काही काम करतो, वागतो ते आपल्या मनानेच. ज्या टाइपच्या लोकान्मद्धे आपन राहतो, त्यांच्या विचारांचा, वागण्याचा प्रभाव आपल्या मनावर होत असतो. कधी चांगला, कधी वाईट. मग आपल्या मनावर जो काही वाईट परिणाम होतो तो आपल्याला धुनें आवश्यकच आहे ना. ती धुल साफ़ करने गरजेचेच आहे ना. मग यावर उपाय, मार्ग तरी काय? उपाय हा की मनाला अंघोळ घालणे, बस...इतकाच..

आणखीही काही ओळी आहेत....जसं.. "या रिम जिम रिम जिम पाउस धारा तन मन भिजवून जाती..."
या ओळीमद्दे देखिल मनाला भिजवन्याच काम केला गेला आहे. खर तर पावसाबद्दलच्या वेगवेगल्या कविता, लिखाण यांमद्धे न चुकता मनाचा उल्लेख असतो म्हणजे असतो. याचा अर्थ एकच होतो की, पाउस आणि मन यांच नात फार जवलच आहे. मोठ मोठ्या व्यक्तीलाही लहान करण्याच काम हा पाउस करू शकतो आणि करतोही. माणूस जस जसा मोठा होतो तस तसा त्याचा अहम भाव, अहंकार देखिल मोठा होतो. मी असा, मी तसा...मी हे करतो ते करतो. पण त्याच्यातला लहान बाळ कुठे तरी लपलेल असतं, दडलेल असतं. काही ठराविक परीस्थितीन्म्द्धेच त्याचे दर्शन होते. जे निश्चल, निरागस आणि निष्कपट असतं. मग आपण कधी कधी आणि कोण समोर लहान होतो..? जो सगळ्यांचा असून वैयक्तित कोणाचाही नसतो, ज्याच्या समोर लहान झाल तरी त्याच्यात काही बदल होत नाही, जो सगळ्यांना सारखं प्रेम देतो...त्याच्या समोर. मग अस कोण? अश्यातला एक म्हणजे निसर्ग...पाऊस...


पाउस मोठ मोठ्या लोकाना कसा लहान करतो याच एक छान अस उदाहरण तुम्हाला सांगतो. ते अस की, माझी एक मैत्रीण डॉक्टर आहे. ती ज्या दवाखान्यात काम करते, तो दवाखाना तिच्या घरापासून ३-४ किमी दूर आहे. तीच घर आणि दवाखाना याना जोडणारा एक सरळसरळ रस्ता आहे. काही दिवसांपूर्वी ड्यूटी संपवून ती घरी निघणार तेव्हड्यात अगदी जोरात पाउस सुरु झाला. झालं इकडे तिच्या सासु-सासऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले, कारन त्याना पूर्ण विश्वास होता की, हि कारटी म्हणजे त्यांची लाडकी सुनबाई, आज नक्की भिजुन येणार म्हणून. मग काय तथास्तु, इकडे हिच्या मनात काय आल काय माहित, तिने मोबाईल-पर्स एका कॅरी bag मधे टाकल आणि बाई साहेब निघाल्या हो तश्याच, भर पावसात.


ती म्हणते की, तिला इतकी मजा वाटत होती की काय आणि कसा सांगू असा झालं होत. जमिनीचा इतका छान सुवास येत होता कि डोळे बंद करून त्यात हरवून जावसं वाटला. जोरात पाउस पडत असल्याने रस्त्यावर ट्राफिक पण नव्हत. फ़क्त ती आणि पाउस बस. फ़क्त पावसचाच आवाज येत होता. जणू काही त्याला भेटण्यासाठी सर्वांनी आपापली सर्व काम सोडून दिली होती. त्याने सर्वाना निशस्त्र करून टाकल होत असं म्हणा की सर्वांनी स्वतःहून त्याच्यासमोर आत्मसमर्पण केलं होतं असं म्हणा. पूर्ण रास्ता भर काहीच विचार नव्हता पण तिच्या चेहरयावर कसलीशी स्माइल होती. अगदी ओली चिम्ब झाली होती, पण तिला अगदी अगदी फ्रेश आणि हलकं वाटायला लागलं होत, जणू काही ड्यूटी वरुण आली नाही तर तर ड्यूटी वर चालली आहे अस वाटत होत. मुददामून पाण्यात पाय आपटत चालली होती, कधी कधी पाण्यात उडी पण मारावीशी वाटली (२-४ दा मारली पण). 3-४ कीमी अंतर कस गेल हे तिला काहीच कळेना. जस काय कोणत्या अगदी जवलच्या फ्रेंड बरोबर गप्पा मारत होती. जवलचा फ्रेंड जर का फार दिवसांनी आपल्याला भेटला तर मग काय, सभोवतालच जग अगदी शुन्य वाटत, नेमका तसच फिलिंग येत होतं. पुढे तर ऐका, इतक्या वेळ पावसात भिजल्या नंतर माणसाने जाव ना चूप चाप आपल्या घरी, तर नाही बाई साहेब अपार्टमेंटच्या मेन गेट मद्धे घुसल्यावर घराच्या दिशेला न जाता त्याच्या ओपोझीट साईडला लहान मुलांच जे गार्डन होता ना, तिथे गेल्या आणि जवळ जवळ अर्धा तास झोका खेळत बसल्या. मोठमोठ्या पेशंटला इंजेक्शन देताना ज्या कठोर मनाचा डॉक्टर तिच्यात होता (कारण सहजा सहजी ऐकल तो पेशंट कसला, त्याला नीट करण्यासाठी कठोरच बनाव लागतं) त्या डॉक्टरला या पावसाने अगदी बालवाडीत जाणारी मुलगी बनवून टाकली होती.खरच नमस्कार आहे तिला, आणि पाऊस महाराज तुम्हालाही.

आणखी सांगायचं झाल तर माझा मित्र विजय, इंजिनियर आहे.जॉब करतो मुंबईला पण राहतो नाशिकला. ज्या दिवशी जोरात पाऊस सुरु झाला तेव्हा साहेब नाशिकलाच होते. मग काय या हिरोने भर पावसात गल्लीतल्या सर्व लहान मुलांना एकत्र केलं आणि क्रिकेट खेळत बसला हो.. खूप वेळ.

मग इथे लहान कोण....? सगळेच...पावसा समोर सगळेच लहान आहेत...मग या पावसाला उपमा तरी कोणती द्यायची..? अगदी अगदी जवळचा..जो असेल तो. ज्याच्या जवळ आपण आपले सारं मन मोकळ करून बोलू शकतो. आपल्या हक्काचा वाटतो तो, कधीही त्याच्या जवळ गेलं, अगदी कधीही तरी तो आपल्याला त्याची जादूची झप्पी देणारच, अगदी १००%. मग काय अगड़म बगड़म छू. सर्व थकवा, निराशा, आळस काही क्षणा करता का होईना दूर निघून जातो... तो जाता जाता नवी आशा, नव्या दिशा दाखवून जातो आणि जगण्याची सोपी भाषा शिकवून जातो.


मनाच्या अंघोळीसाठी इतक पुरेस आहे, असं मला वाटत.... तुम्हाला काय वाटत?