Monday, June 21, 2010

पहिली चोरी...(cont)
तर रात्रि अमोल झोपला आणि सकाळी काय झाल हे मी तुम्हाला आता सांगणार आहे.
नॉर्मली हि मंडळी समोरचा दरवाजा लावल्या नंतर आतल्या रूमचे दरवाजे लावत नसत, फक्त ढकलून घेत आणि आप आपला जिव की प्राण (मोबाइल, पाकिट वगैरे) आपल्या उशी जवळ ठेवत.
त्या दिवशी सकाळी पहिले आदेश (जो मच्छर दाणित जोपतो तो) उठला आणि किती वाजले हे बघन्या साठी आपल्या उशी जवळ आपला मोबाइल शोधायला लागला. पण त्याला काय मोबाइल सापडेना, त्याला वाटले की ठेवला असेल कुठे तरी रात्रि, म्हणून त्याने गगन ला हाक मारली आणि टाइम किती झाला हे विचारले. प्रथम गगन ने आदेश ला शिवी दिली कारन आज शनिवार असल्याने कोणीही सूर्य छान पैकी वर आल्याशिवाय उठायचे नसते हा अलिखित नियम आदेश ने तोडला होता. त्यावर आदेश ने त्याला उलट शिवी देत परत टाइम किती झाला हे विचारले. तेव्हा यावर परत आदेश ला शिवी देत गगन ने उशी जवळ हात घातला, पण त्यालाही मोबाइल मिलेना. मग जिवावर आल्यासारखा करून त्याने उशी उचलली, पण मोबाइल गायब.
आदेशला थोड़ी शंका आली, तो तसाच पटकन मच्छर दानितुन निघाला आणि आपल्या वस्तु शोधायला लागला, तो पर्यंत गगन उठला आणि अमोल-पि के कड़े जाण्या साठी त्याने दरवाजा ओढला, पण दरवाजा तर उघडेना. गगन घाबरला कारन ते तर दरवाजा कधीही लावत नाहीत आणि आता दोघेही घाबरले कारण आदेशला देखिल त्याच्या वस्तु रूम मद्धे सापडल्या नाहीत. एव्ह्ड्यात त्यांना खात्री झाली होती की रूम वर चोरी जाली आहे, आणि त्याना चोरांनी रूम मद्धे बंद करून ठेवले आहे. त्याना काय करावे हे काही कळत नव्हते. मग दोघे जन द्रौपदीने जशी श्रीकृष्णाला जीवापासून हाक मारली होती तसेच पण जरा आरडा ओरड करत रस्त्या वरुण कोणाला तरी बोलवायला लागले... अरे भैय्या कोई है..कोई हे.
त्यांचा आवाज ऐकून एक मुलगा आला आणि त्याने बाहेरचा दरवाजा उघडला (ज्याने अमोल रात्रि आत आला होता आणि आता तो चोर बाहेरून लावून गेले होते), आणि आत येउन आदेश-गगन यांचा रूम उघडला. गगन पटकन बाहेर आला आणि त्या मुलाला म्हणाला की आमच्या रूम मद्धे चोरी जाली आहे. हे ऐकून तो मुलगा पटकन तिथून निघून गेला. मग गगनने पिके(प्रज्योत कटारिया)- अमोल चा रूम उघडला (जे अजुनही साखर झोपेत होते).
पिके उठला(अमोल ची स्थिती तुम्हाला माहीतच आहे ), गगनने त्याला विचारले की त्याचा मोबाइल-पाकिट कुठे आहे म्हणून. पिके ने आपली उशी उचलली, आणि त्याला आपला मोबाइल सापडला, पण शेजारी असलेल्या शेल्फ मद्धे त्याच पाकिट मात्र नहीं सापडला. गगन ने त्याला सांगीतल की त्यांच्या पण वस्तु गायब आहेत म्हणून आणि आपल्या रूम मद्धे चोरी जाली आहे. मग पिके जोर जोराने अमोलला उठवायला लागला. आता रात्रि उशिरा ज़ोप्ल्याने त्याला उठवने पिके ला अवघड जात होते. पण तरीही पिके ने त्याला उठवले अणि जोरात बोलला की भाऊ तुजा मोबाइल कुठे आहे रे(अमोल ला त्याचे सर्व हिंदी मित्र परिवार आणि काही मराठी मित्र देखिल प्रेमाने भाऊ म्हणत- फक्त boys, girls नाही बर का). सकाळी सकाळी पिके मोबाइल बद्दल त्याला का विचारत आहे ह्या गोष्टीचा अमोल ला फार राग आला. शिवी देता पिके ला मोबाइल दाखावन्या साठी अमोल ने आपल्या उशी जवळ उजव्या बाजूला हात टाकला. - दा इकड तिकडे चाच पडला पण मोबाइल काय हाताला लागेना. मग अमोल उठला आणि त्याने उशी उचलली, पण मोबाइल तर तिथे नव्हता. याला काही कलेच ना, की मोबाइल कुठे गेला म्हणून (आधीच तो पूर्ण झोपेत होता त्यात हे काम करण त्याला जड़ झाल होत), आणि शेजारच्या कपाटात त्याला त्याच पाकिट पण नाही सापडल. गगन ने त्याला सर्व हकीकत सांगितली. सर्वांना ह्या गोष्टीचा नवल वाटल कि हे सगळ ऐकून अमोल उठला थोडा पानी पिला आणि परत झोपी गेला.

आता थोडासाच बाकी राहिला आहे...तर ते लवकरच लिहीन..

Monday, June 14, 2010

पहिली चोरी....

पहिली चोरी.... अहो मी नाही केली, आमच्या रूम वर झाली होती.
फार दिवस जालेत ही गोष्ट मनात होती, कोणालाही जास्त सांगीतल नव्हत या बाबत. पण मनात ठरवल होत की कधी तरी नक्कीच लिहू या अनुभवा विषयी. कारन असा अनुभव असनारया नशीबवान तुरलक लोकांपैकी मी स्वतः ला एक समजतो. कारन असा अनुभव जास्त लोकांच्या नशिबात नसतो (आता मला अनुभव आला आहे आणि या अनुभवा वरुण कोनाच्याही नशिबी असा अनुभव नाही यावा अशी ईश्वर चरनी प्रार्थना करतो..असो)
ह्या कथेत ४ पात्र आहेत. अमोल, गगन, आदेश आणि प्रज्योत. हे सर्व मंडळी हैदराबादला एका आय टी कंपनीत काम करत, आणि ते टोली चौकि नामक area मध्दे राहत होते (ज्यांना हैदराबाद माहित आहे त्यानां हा area कसा आहे ते नक्कीच माहित असणार ..असो). त्यांचा रूम बरया पैकी मोठा होता. त्यात ४ बेड, ४ पंखे, टीवी, फ्रीज, वाशिंग मशीन अस सगळं काही होतं. एका रूम मद्धे प्रज्योत-अमोल आणि दूस-यात आदेश-गगन असे राहत. आदेश मच्छरदानित झोपत असे, कारन त्याला एकदा डेंगू झाला होता. तेव्हा पासून तो सकाळ- संध्याकाल काला हिट रूम मद्धे मारत आणि सकाळी बाथरूम मद्धे जाण्याच्या १० मिनिट पूर्वी काला हिट नक्की मारत असे, आणि मगच आत प्रवेश करत असे. बाकी तिघे त्याला चिडवून म्हणत की, मच्छर त्याला पाहून नक्की म्हणत असतील "आदेश आया भागो...आदेश आया भागो"...असो. असे हे सगळे जन गेल्या ८-१० महिन्यानपासून तिथे राहत होते.
काही दिवसांपासून अमोलला कंपनीत थोडा जास्त काम असल्या कारणाने रूम वर येण्यास रात्री जरा उशीर होत होता (आय टी मध्दे काम?...बापरे). मग रात्रि दरवाजा उघडणार कोण या हीरो साठी? खर तर ह्या गोष्टीच इतक टेंशन नव्हत, कारन ह्या लोकांची समोरचा दरवाजा उघडण्याची अजब पद्धत होती. खर तर ती यांनीच शोधली होती कारण बेच्लर लाइफ मध्दे जी काम तुम्हाला नाही करायला आवडत त्या पैकी एक म्हणजे आराम करत असताना कोणी आल तर दरवाजा उघडणे. खर तर या ४ डोक्यां व्यतिरिक्त अगदी तुरळक लोक यायची. म्हणून या ४ पैकी जो आला त्याने गुपचुप स्वतः दरवाजा उघडून आत येणे कारण कोणी तरी दरवाजा उघडेल या हिशोबाने कोणीही तो उघडत नसे.
तर ती दरवाजा उघडण्याची पद्धत अशी कि, खिडकी उघडायची, मग उम्ब्य्रा वर उभ राहायचं (डाव्या हाताने कडी ला पकडून), आणि खिडकीतून आत असलेली जाळी धक्लायाची(उजव्या हाताने). जाळी उघडली कि आत हात टाकायचा आणि उजवा हात डाव्या सायीडला थोडा वर नेवून कडी सापडवायची आणि मग तिला खाली ओढायच (फक्त जो दारू पिऊन आला त्याची जरा फजिती व्हायची, तुम्हीच इमेजिन करा कस होत असेल त्या बिच्यारयाच..असो).
तर मग त्या रात्रि अमोल पहाटे ४.१५ वाजता आपल्या रूम वर आला (वर सांगितलेल्या पद्धतीने दरवाजा उघडून) आणि बूट-सॉक्स काढून डाइरेक्ट आपल्या रूम मद्धे गेला (फ्रेश न होता). गादी वर पडल्या पडल्या तो झोपी गेला.

सकाळी काय झालं.....?
थोडं imagin करा... बाकी मी सांगणारच आहे हो...