Sunday, December 26, 2010

" फक्त तूच आहेस साक्षी…"


" जसा पाहत असतो चातक वाट ऋतू वर्षाची..
तशी मला कायम असायची आस तुझ्या चाहुलीची..
त्या माझ्यातल्या विलक्षन अधिरतेची….फक्त तूच आहेस साक्षी…"

" सहवास तुझा लाभावा म्हणून माझं नाटक करणं..
येत असून सुद्धा स्वतःला अबोध अस भासवणं
तू समजावणाऱ्या त्या माझ्यातल्या उत्कृष्ट कलाकाराचीफक्त तूच आहेस साक्षी…"

" तू प्रेमाने समजवावं म्हणून माझा रुसणं
तुझ्याकडे पाठ फिरवत डोळ्यांच्या किनारयाने तुजकडे बघणं
तू लाडाने कुरवाळनाऱ्या त्या माझ्यातल्या खुळेपणाची... फक्त तूच आहेस साक्षी…"

" मला पडलेले स्वप्न तुला बोलून दाखवणं..
आणि तुझ मला ते स्वप्न रंगवण्यात मदत करणं..
तूलाही मदहोश करून टाकणाऱ्या, त्या माझ्या श्रीमंत स्वप्नांची...फक्त तूच आहेस साक्षी…"

"' अवघड आहे आपलं मिलन' अस तुझ मुद्दामून बोलणं..
सुन्न मना काही सुचेना म्हणून माझ शून्यात बघणं..
त्या माझ्यातल्या ओसाड नजरेची...फक्त तूच आहेस साक्षी…"

" व्हायचे असह्य विचार, तुझ्या पासून दूर नेणारे
घडी घडी प्रत्तेक क्षणी त्या कारणे मन माझे रडायचे
तुझ्या कुशीत रडणाऱ्या त्या माझ्यातल्या लहान बालकाचीफक्त तूच आहेस साक्षी…"

" आले होते डोळे भरून, होतांना तुज पासून कायमचे दूर
होते कारण तुलाही माहित.. कारणकारण होती अवस्था तुझीही तीच
विरहाच्या त्या माझ्यातल्या अंतिम असह्य अश्रूंची….फक्त तूच आहेस साक्षीफक्त तूच आहेस साक्षी"

Saturday, December 25, 2010

" हा तुझा सुगंध..."

"  हा तुझा सुगंध...मज करतो धुंद… हा तुझा सुगंध..."


"  तू येता जवळ...(2)
मिटुनी डोळे रोमारोमात भरण्याचा जडला मज छंद…हा तुझा सुगंध..."


"  उभारती तनावर आनंदाचे शहारे...(2)
अन उठवती मनात लाखो तरंग..हा तुझा सुगंध..."


"  पडतात शब्द तोडके...(2)
इतका मनास माझ्या देतो अवर्णनीय आनंद…हा तुझा सुगंध..."


"  नेतो मज सातव्या अस्मानी...(2)
जिथे दिसते तीच आणखी कुणी नको असते मज संग... हा तुझा सुगंध..."


"  भूलववितो जगाला…(2)
विसरववूनी माझं मला, जसा आनंदात जळणारा पतंग…हा तुझा सुगंध..."


Thursday, December 16, 2010

" मना माझ्या घे भरारी..."


“ मना वाटते घ्यावी उडी,
त्या निळ्या खोल समुद्रातळी,
जिथली स्तब्द शांतता,
देखिली नाही अजून कुणी  …”

“ मना वाटते बनावे,
नाजुकसे दव पहाटचे,
ज्याची काही क्षणाची सुंदरता,
लाभली कुणाला…”

“ मना माझ्या हवे,
उत्तुंग आकाश आनंदाचे,
जिथे करू पाहिल विहार स्वच्छंद,
जिथे भय नाही कुणाचे…” 

“ मना वाटते बरसावे,
बनुनी घन प्रेमाचे,
घेऊन टाकावे मिठीत,
मला हवे जे सारे…”

“ मना माझ्या घे भरारी,
शोध वाट नव्या विश्वाची,
टाक तोडून  बंधन सगळे,
तुटता तुटले जे कुणाच्याही…”

Tuesday, November 30, 2010

" काय यालाच प्रेम असं म्हणतात…?"


" दिसते कश्यातही तिचंच रूप,
तरी फक्त तिच्याच कडे बघायला आवडतं,
तीच आठवते पहिल्या पावसाच्या सुगंधात,
काय यालाच प्रेम असं म्हणतात…?"

" ती असता दूर, कुठे मन लागत नाही,
आणि ती येता जवळ, काही शब्दच सुचत नाही,
होतो तिचाच आभास इंद्रधनुच्या रंगात,
काय यालाच प्रेम असं म्हणतात…?"

" असता तिच्या बरोबर वेळ जातो सर सर,
स्वप्नात तरी थांबते म्हणून कधी वाटतं स्वप्नच बरं,
तीच तीच भासते गार रान वाऱ्यात,
काय यालाच प्रेम असं म्हणतात…?"

" माझी नजर शोधते गर्दीत तिला,
तिच्यासाठी विदुषक व्हायला आवडते मला,
तीच तीच स्मरते कवितेतल्या प्रत्तेक शब्दात,
काय यालाच प्रेम असं म्हणतात…?"

" तीच आठवते एकटे पणी,
पण तीच राहते मनात  बरोबर असतानाही कुणी,
तीच जाईत, तीच जुईत, तीच आठवते निशिगन्धात,
काय यालाच प्रेम असं म्हणतात…?"


Sunday, November 28, 2010

मनुष्य प्राणी..

मनुष्य प्राणी..
मनुष्य आणि प्राण्यात जास्त काही फरक नाही. जो काही फरक आहे तो म्हणजे मनुष्य जीवन विकासासाठी आपल्या बुद्धीचा उपयोग करतो. पण प्राणी, ते तसं काही करू शकत नाही. दोघेही एकमेकांना घाबरतात. प्राणी एकवेळ नाही घाबरत मानवाला पण आपणबापरे बाप. आपण त्यांच्या पासून जितके लांब राहता येयील तितके लांब राहतो. ते बिचारं जवळ जरी आलं तरी पण काही जन इतके दचकून जातात, कि जणू काही प्रत्तेक प्राणी हा मौंसाहारीच असतो आणि तो जवळ आला म्हणजे आपल्याला चावणारच किव्वा खाणारच. ते इतके घाबरतात कि त्यांना पाहून आपल्याला पण भीती वाटते, कि काय अनर्थ झाला म्हणूनकाही लोकं असतात असेसमझने वाले को इशारा हि काफी हेJ

आता मनुष्यप्राणी इतर प्राण्यांना घाबरतोघाबरतो काय चांगलाच घाबरतो. भलेही ते छोटे असो किव्वा मोठे. मग मी स्वतः पाहिलेले, अनुभवलेले काही क्षण तुम्हाला सांगतो.

उंदीर..आपल्या तथाकथित शत्रुंपैकी एक. एकदा असंच मी आमच्या रूम मद्धे आराम करत, वाचत बसलो होतो. रूम बाहेरून आदेश कोणाला तरी जोर जोरात शिव्या देत असल्याचं मला ऐकू आलं. नेहमीचच म्हणून मी तिकडे दुर्लक्ष केलं. मग तो मला बोलवायला लागला. मी तिथूनच विचारलं कि काय काम आहे म्हणून. आता तो माझ्या रूमच्या दरवाज्यात उभा राहून बोलू लागला, “अरे भाऊ, उस साले चुहे को भगा ”. घ्या म्हणजे हा त्या शिव्या उंदराला देत होता. “अबे बोर मत करमी ओरडलो. “प्लीज भाऊ, प्लीज भगाना उसको. नही तो वो मेरे रूम मी जायेगा. तेरे सिवा ये काम कोई नही कर सकता ना रे”.
साले इतनासा तो हे वो, जोरसे चिल्ला, भाग जायेगा
नही रे भाऊमेरेको डर लगता हे ना, कभी नही किया रे ऐसा”.
तो साले तू ऐसा बोलना चाहता है कि, मेरेको बचपन से चुहे मारणे कि आदत हे”. सगळे हसले, आदेश पण. मग बाहेरून गगन मुद्दामून मला चिडवण्यासाठी आदेशला ओरडून म्हणाला कि, “क्या रे.. भाऊ क्या चुहेमार लगता हे तुझे, बोल..बोल”  
हा रे SSSSगणतेरे मन कि बात समझ गयीमाझ्या शेजारच्या बेड वर असलेला पिके ओरडून बोलला.
भाऊ, ये पिके हम दोनो भायीयोमे दरार डाल्नेकी कोशिश कर रहा हे, इस्की बात मत सून तूआणि परत मुद्दामून बोलला, “मे क्या तेरेको कभी चुहे मार बोल सकता हून क्या”. “नही रे, कभी नहीत्याला वैताकत मे बोललो.
भाऊ, इन दोनो कुत्तो कि बात मत सून, उस चुहेको भगा ना पहले..प्लीज यार…”
ठीक है रे, रो मत अबअसं म्हणत मी रूम बाहेर आलो. "किधर हे वो चुहा”.
वो उधर, वाशिंग मशीन के पीछे”.
मग मी झाडू घेतला हातात, म्हटल काय वैताक आहे या पोरांचा, इतक्याश्या उंदराला घाबरतात, आणि त्या उंदराला शोधायला लागलो. आदेश खूपच एक्सायिट झाला होता, मधेच तो जोर जोरात ओरडत होता, “मार...साले को मार”. मी वाशिंग मशीन थोडी हलवली आणि तो उंदीर सटकन दुसरी कडे पळाला, कपाटा खाली गेला आणि मी त्याच्या मागे. “मार..कुत्ते को मार.. छोडना नही साले को”. ह्या उंदराला आदेश कुत्ता, साला, हरामखोर असं काय काय बोलत होता. मला तर हसूच येत होतं. हि गम्मत ऐकून पिके पण बाहेर आला.

मी कपाटाखाली झाडू टाकणार तेव्हड्यात तो उंदीर आदेशच्या दिशेने पळाला. “SSSS... SSSSअसं म्हणत आदेश पटकन जवळ असलेल्या खुर्ची वर चढला आणि पिके..तो झटकन दार लावत आत पळालाह्या उंदराने चांगलीच गोची केली होती. मी मागे वळून बघे पर्यंत तो कुठे गेला कळलंच नाही. “किधर गया रे वोमी म्हणालो. “वो वो उधरहरामजादा उधर भाग गया देखआणि आणखी 2-4 शिव्या हासडल्या त्याने, त्या इथे लिहू नाही शकत. मी सगळे टेबल जोर जोरात हलवले, तो साला विजे सारखा कुठूनपण निघायचा, इकडे तिकडे घुसायचा आणि मी त्याच्या मागे पळायचो. शेवटी कुठे तो निघाला आणि बाहेरच्या दरवाज्याकडे पळाला, “भगा भगा साले कोखुर्ची वरूनच आदेश बोलला. "हुSSSS..." म्हणत मी झाडू फेकला आणि दरवाजा लावला. आदेश अजून खुर्ची वरच उभा होता, त्याला म्हणालो कि गेला तो मग कुठे हा उतरला खाली

इतकासा तो प्राणी तो स्वतः घाबरून जीव मुठीत धरून पळत असतो तरी पण आपण त्याला इतकं घाबरतो, कारण..कारण जो घाबरतो त्यालाच माहितअसो.

दुसरा प्रसंग आमच्या घरातलाच. एकदा आमच्या घरा बाहेर सकाळी सकाळी मांजरीच्या पिल्लाचा आवाज ऐकू आला. निकिता, माझ्या भावाची लहान मुलगी, ती पण दरवाजा जवळ जावून त्या पिल्लासारखं म्याव-म्याव आवाज करू लागली. मी ओरडलो तिला, कि असं करू नको म्हणून, त्या पिल्लाला असं वाटेल, कि तिची मम्मीच इथे आहे. मग निकु वहिनीच्या मागे लागली कि त्या पिल्लाला आत घे म्हणून. वहिनीने नकार दिला. इकडे त्या पिल्लाचा म्याव-म्याव आवाज थोडा वाढला, म्हणजे ते अगदी दरवाज्या जवळ येऊन ओरडायला लागलं होतं, आणि आमची निकु आतून त्याला त्याच्या सारखाच प्रतिसाद देत होती, म्याव-म्याव करून.   
  
निकु घडी घडी वहिनीला विनंती करू लागली, “प्लीज मम्मीप्लीज मम्मी, थोल्या वेल प्लीज”. शेवटी निकुच्या आणि त्या पिल्लुच्या आवाजाने वहिनीच्या मनाला साद घातली आणि मग त्यांना पण उत्सुकता वाटू लागली त्याला पहायची. “थांब आपण फक्त बघू त्यालाअसं म्हणत वहिनी दरवाज्याकडे गेल्या, आणि निकु त्यांच्या मागे हळूच लपून दरवाज्या कडे बघू लागली.

वहिनीने थोडासा दरवाजा काय उघडला, त्या पिल्लाने दिली मान घालून त्या फटीत. घ्या आता वाहिनीला धड दरवाजा पूर्ण उघडता पण येयीना आणि बंद पण करता येयीना. मग काय, झाली गम्मत सुरुवहिनी तश्याच ओरडायला लागल्या हट हट हट...शुSS शुSSशु….” तर निकु लागली उड्या मारायला, “ म्याव... म्यावम्हणत. शेवटी जबरदस्ती ते पिल्लू घरात घुसलंच आणि दरवाज्या जवळ असलेल्या टेबलाखाली जाऊन ओरडू लागलं.

वहिनीची झाली पळापळ सुरु, आल्या झाडू घेऊन त्याला हुसकन्या साठी. पण जवळ जायची हिम्मत कुठे.. लांबूनच त्याला झाडू दाखवू लागल्या आणि इकडेमम्मी लाहुदेना त्याला..लाहुदेना..थोल्याच वेल..” असं निकु वहिनीची साडी धरत थोड्या विनवणीच्या भाषेत बोलायला लागली. चांगलीच गम्मत चालू होती. 8-10 मिनिटं असाच टायीम पास चालू होता, पण ते पिल्लू काही बाहेर जायचं नाव घेयीना. इतकसं ते पिल्लू, चांगलंच परेशान करून टाकलं वहिनीला.  " काय करायचं आता..कसं बाहेर काढू याला..?". म्हणालो कि, "उचला आणि टाका बाहेर". यावर वहिनीने असं लुक दिलं, कि जसं काही मी वाघाच्या पिंजऱ्यात हात टाकायला लावला त्यांना. वहिनी परत, "... हट-हट" असं ओरडू लागल्या. असं केल्याने ते काही जाणार नव्हतं, हे मला तर माहीतच होतं आणि एव्हाना वहिनीला पण कळून चुकलं होतंकाय वायीट परिस्थिती होती, एक छोटंसं पिल्लू ते पण कावऱ्या बावऱ्या अवस्थेत घरात घुसलेलं, चांगलाच घाम आणला वहिनीलामी उठलो, उचललं त्या पिल्लाला आणि टाकलं परत बाहेर, मग कुठे दोघींनी सुटकेचा श्वास सोडला.

इतकेसे ते प्राणी.. कावरे बावरे. त्यांनी ठरवलं तरी पण काही करू शकत नाही ते. तरी पण आपण का इतके घाबरतो त्यांना काय माहित...? असा हा मनुष्य प्राणी...
हि भीती तरी कशी घालवायची. तुम्हाला काही उपाय सुचला तर सांगा... तो पर्यंत मी पण शोधतोJ

Monday, November 22, 2010

" मज वाटतो हेवा..."


"मज वाटतो हेवा.. त्या फुलांचा,
ज्यांना करते ती नाजूक स्पर्श आणि भरते  रोमारोमात त्यांचा सुगंध",

"मज वाटतो हेवा.. त्या वाऱ्याचा,
जो कधीही तिच्याशी खेळू शकतो, नकळत तिच्या सवे कायम राहता",

"मज वाटतो हेवा.. त्या थेंबांचा,
जे गालांवरून सरकत जावून, करतात स्पर्श तिच्या नाजूक अधरांना "

"मज वाटतो हेवा.. त्या रेशीम धाग्यांचा,
जे बनून सुंदर वस्त्र, तीच मनमोहक रूप आणखी खुलवतात",

"मज वाटतो हेवा.. त्या पाऊल वाटांचा,
ज्या वर तिचे नाजूक पाऊल पडताच त्या तिच्याच सवे चालू लागतात",

"मज वाटतो हेवा.. त्या जल धारांचा,
ज्या तिच्यावर मनसोक्त बरसून त्या कोमल देहास घट्ट मिठीत घेतात",

"मज वाटतो हेवा.. त्या शय्येचा,
जो तिच्या नाजूक कायेस देतो आधार, प्रेमाने कुरवाळता",

"मज वाटतो हेवा.. त्या क्षणांचा,
जे तिच्या मुखावर आणून हसू तिच्या गालान्वरची खळी खुलवतात",

"मज वाटतो हेवा.. त्या अश्रूंचा,
जे तिच्या डोळ्यात कायम राहून, कधी तिच्या नाजूक पापण्यांतून हळूच ओघळतात", 

" मज वाटतो हेवा.. त्या स्पर्शाचा,
जो होताच, अंगावर माझ्या क्षणात लाखो शहारे आणतात"