Wednesday, July 11, 2012

'मिशन हरिश्चंद्र गड - 4'


आपल्याला वाटेल कि हरिश्चंद्रगड म्हणजे इतर गड किल्ल्यासारखा असेल. दगडी भिंती, बुरुज वगैरे वगैरे. अशी कल्पना करण्यात काही गैर नाहीये कारण जास्तीत जास्त गड किल्ले हे असेच असतात. पण प्रत्तेक गोष्टीला अपवाद असतो ना. तसा हा गड. फार मोठी विस्तीर्ण जागा होती ती. लांब पर्यंत काळा खडक दिसत होता तिथे आणि त्यात हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा जरा वरचा भाग. म्हणजे जरा शोधावच लागलं ते, लांबून इतकं स्पष्ट नव्हतं दिसत. ५-७ मिनिट सरळ वाट चालून मेन मंदिराजवळच्या भागात आलो. हा जरा उंच भाग होता. भरपूर हॉटेल दिसले तिथे. हॉटेल म्हणजे अश्या छोट्या छोट्या मोकळ्या झोपड्या. त्यांच्या मागे होतं ते तारामती शिखर. बरच उंच वाटत होतं ते. तिथे डाव्या बाजूला एक रस्ता जात होता, तो म्हणजे टोलार खिंडीकडे नेणारा रस्ता. अहो फारच लांब होतं ते इथून. जास्तीत जास्त पुणे कर मुंबईकर त्याच रस्त्याने गडावर येतात.असो. ह्या उंच भागात अनेक छोटी काळ्या दगडाची मंदिरे होती. असे भगवे झेंडे लावलेली.
पोहोचलो तुळशीरामाच्या हॉटेल मध्ये. तिथे त्याचा मोठा भाऊ होता. फारच गरम झालं होतं म्हणून पहिले थोडा आराम करून पुढे निघण्याचा निर्णय घेण्याचं ठरलं. अगदी थंडगार पाणी पाजलं हो त्यांनी. मन शांत झालं. मग मस्त २ ग्लास सरबत पिलं. आमच्या पहिले १०-१२ जणांचा एक ग्रुप तिथे बसलेला दिसला. ते लगेच गेले. आम्ही बसलो माहिती काढत.. गप्पा मारत... उन भरपूर होतं ना हो म्हणून वाटलं कि जरा बसावं ह्या झोपडीत. जेवणाचा मेनू विचारून आम्ही पिठलं भात खाण्याच ठरवलं. पहिले जवळच्या सगळ्या जागा बघू मग जेवायला येवू आणि मग पुढचं बघू असं ठरलं.

तुळशीरामाच्या भावाला भरपूर प्रश्न विचारले आम्ही आणि बिचारा सगळं सांगत पण होता. त्याने सांगितलं कि महाशिवरात्रीला भयंकर गर्दी असते वर २० एक पोलिसांचा बंदोबस्त असतो म्हणे तेव्हा. पावसाळ्यात अतिशय रम्य वातावरून बनून जातं, असं वाटत कि गडावर पुष्प वर्षाव झालाय इतकी फुलं असतात म्हणे. लोकांची कायम ये जा असते. नंतर गावाबद्दलची माहिती दिली, तिथले लोक, पिकं वगैरे सगळं सांगितलं.


१५-२० मिनिट भरपूर गप्पा मारल्या आणि मग उठलो. त्यांनी आजू बाजू असलेली सर्व ठिकाणे सांगितली. निघालो त्या दिशेने. जागा खडकाळ होती म्हणजे पावसाळ्यात कायम पाणी तिथून वाहत असणार. ती थोडी उंच जागा उतरून खाली आलो. पहिले एक चौकोनी पाण्याचा छोटासा तलाव लागला. 'सप्ततीर्थ पुष्करणी' म्हणून. काळ्या दगडाने बांधलेला. कडे जरा तुटलेले होते आणि दगड जरा वेग वेगळे झाले होते. तलावाच्या एका बाजूला छोट्या दगडी खोल्या होत्या. जरा खोलच होता तो तलाव म्हणजे ३-४ पायऱ्या उतरून खाली जावं लागणार असा. तिथलं पाणी थोडा हिरवट वाटत होतं म्हणून मनातला मोह आवरला आणि पुढे निघालो वरच्या    
                                                                                     बाजूला जेथे भरपूर गुहा आहेत तेथे. एक एक करून 
ह्या गुहा पहिल्या. जवळ जवळ बांधलेल्या होत्या त्या. अगदी चांगल्या अवस्थेत होत्या म्हणजे पावसाची काही भीतीच राहणार नाही अश्या. बहुतेक मंडळी जी दोन दिवसांच्या ट्रेक वर येतात ते ह्याच गुहांमध्ये राहतात. ह्या गुहांच्या वरच्या बाजूस डोंगराचा भाग दिसत होता. म्हणून वर जाऊन पाहण्यात काही अर्थ नव्हतं कारण भरपूर महत्वाच्या गोष्टी बघणे अजून बाकी होत्या. पण हरी काही ऐकेना आणि लागला चढायला त्या दगडांवर, म्हणालो कि नको जाऊ बाबा वर काही नसणार. तो चढला कसा तरी वर आणि केली इच्छा पूर्ण. पण उतरतांना करून घेतली गोची. म्हणालो कि आम्ही चाललो पुढे तू ये मागून. परत त्या तीर्थाच्या बाजूने खाली आलो.


                                                                                         
तीर्थाच्या खालच्या बाजूला हरिश्चंद्रेश्वर मंदिर आणि त्याचाही खाली केदारेश्वर मंदिर. नीट बघितलं तर हे सगळे मंदिर एका नदीच्या रस्त्यात बनवले असलेले दिसले. म्हणजे डोंगरावरच पाणी जेव्हा उतारावरून वहायला लागेल तेव्हा ते ह्या मंदिराला काही प्रमाणात पाण्यात बुडवूनच पुढे जायील अशी काही बांधणी होती त्या मंदिराची. कित्ती दिवसांनंतर आज कुठे दर्शनाचा योग आला. हरिश्चंद्रेश्वर मंदिर अगदी पुरातन आहे छान कोरीव काम केलेलं. आजूबाजूला दगडी भिंती होत्या. आत मध्ये छान मंदिर. मंदिराच्या आत शंकराची पिंड. आत भरपूर पाणी होतं जे पाणी आहे ते इथले लोक पिण्यासाठी वापरतात तेच आम्ही पण प्यायलो होतो. मंदिराच्या डाव्या बाजूला म्हणजे त्याच्या भिंतीच्या मागे हि गणपतीची सुंदर मूर्ती आहे. मंदिराच्या आजू बाजू म्हणजे त्याच चार भिंतीत काही छोटी मंदिरे आणि कोरीव काम केलेलं खांब होते. तिथेच एक मोठा नंदी पण दिसला. इतक्या उंच ठिकाणी येऊन अशी पुरातन जागा जेव्हा पाहायला भेटते तेव्हा विश्वासच बसत नाही कि कोणी इतक्या वर अशी छान मंदिरे बंधू शकतो. असो. एक एक करत मनाची इच्छा पूर्ण होतं होती. तिथलं छान पैकी दर्शन घेत आम्ही निघालो खाली केदारेश्वर कडे.

केदारेश्वर म्हणजे दगडात कोरलेल्या प्रशस्थ गुहेत भोलेनाथाची फार मोठी शिवलिंग होती ती. अगदी मिठी मारली तरी पण हात अपुरे पडतील अशी. चारही बाजूंना चार दगडी खांब (२-३ तुटलेले होते). सगळी कडे पाणीच पाणी आणि अगदी मधोमध ते शिवलिंग. फार गार पाणी होतं..फारच गार.. म्हणून जास्त पुढे जाण्याचा विचार सोडून दिला. तिथेच पाण्यात पाय टाकून थोडा वेळ सगळे गप्पा मारत बसलो. विजयची मस्त फोटोग्राफी चालू होती.

वेळ कसा जात होता कळतंच नव्हतं. मस्त भूक पण लागली होती. गेलो परत हॉटेल वर. जेवणाची मस्त तयारी चालू होती गरम गरम पिठलं भाताचा बेत होता ना. थोडं फ्रेश झालो आणि मग बसलो जेवायला. काय चव होती यार त्या जेवणाला अगदी झकास.. मजा आली. सगळे अगदी पोट भर जेवलो. जेवता जेवता पुढचा रस्ता विचारला. तारामती शिखर वर जाऊन परत कोकण कड्यावर जाणं जरा अशक्य वाटत होतं कारण ५ पर्यंत खाली पोहोचायचं होतं. म्हणून फक्त कडा पाहायचा अस ठरलं. झालं… हरी लागला परत ओरडायला कि नाही तारामती वर पण जायचं म्हणून. पण आमच्या तिघांचं ठरलं कि फक्त कडा बघायचा आणि परतीची वाट धरायची. हरी जरा उखडलाच होता पण काय करणार. असो. 
क्रमश:

4 comments:

 1. Its wonderfull experience naa............
  I will also preferred to go this Harishchandra Gad

  ReplyDelete
  Replies
  1. are wonderful...amazing...awesome experience hota yaar... aani nakkich jaun ye...farach bhari jaga aahe...!!! :)

   Delete
 2. Tramati pahayala hav hot,amhalahi samajal asat na te kas ahe....................

  ReplyDelete
  Replies
  1. are parat janar aahot tevha lihin mag... aani jar ka tu aadhi gelas tar kalav aamhala :)

   Delete