Sunday, April 1, 2012

'मिशन हरिश्चंद्र गड - १'

सुरुवात येथे वाचा..
चला तुम्हाला सांगितल्या प्रमाणे पुढची पोस्ट (म्हणजे पुढच्या पोस्ट) हरिश्चंद्रगडाबद्दलच आहे. 
जाण्याच्या आदल्या दिवशी फार गोंधळ झालेत. कुणाचा कुणाशीही संपर्क झाला नाही कारण सगळे कोणत्या कोणत्या कारणाने फार बिझी होते. मग रात्री एकत्र आलो ११-११.३० ला. व्यवस्थित प्लानिंग करायचा होता पण काही वेळ नव्हता.  प्लानिंग नसलं कि गोंधळ होतात (कळेलच लवकर तुम्हाला).  थोडा वेळ बोलून, डिस्कस करून झालं प्लानिंग कि थोड्या वेळात म्हणजे सकाळी -.३० ला निघायचंम्हणजे ८ पर्यंत पाचनई गावी पोहोचू आणि गडावर ११ वाजे पर्यंत पोहोचून जावू. (पण रात्री १२ वाजता तयार झालेल्या प्लानिंगचे पण १२ वाजणार होते अस अजिबात वाटलं नव्हतं )               
कमलेश चा मोठा प्रॉब झाला होता म्हणून सकाळी तो काही येऊ शकत नव्हता पण त्याने सकाळी आम्हाला तिथे सोडून देण्याची आणि परत घ्यायला यायची तयारी दाखवली. तो एव्हड बोलला तेच पुरे झालं (पण नंतरच्या अनुभवा वरून तो आम्हाला फक्त सोडायला जरी आला असता तरी त्याची अगदी वाट लागली असती असं तर मी १००% टक्के सांगू शकतो. पुढे सांगतोच ) असो. मग पहाटे आम्ही चौघे निघणार हे नक्की झालं मी,विजय, विनोद आणि हरीश.    
हरीश स्वतः काही प्लानिंग करत नाही (त्याच्या मनात फक्त ट्रिप ला जाऊन एन्जोय करायचा एव्हडच असतं) तो फक्त म्हणतो मी कळपातली मेंढी आहे, तुम्ही जिकडे जाल मी तिकडे येयीन. पण मग सकाळी लवकर जाण्यावरून किव्वा काही प्लानिंग वरून आमच्याशी कायम  डोकं लावतो हा . यावर आपण बोललो कि काय रे तू तर  कळपातली मेंढी आहे ना..मग कश्या साठी डोकं लावतो? मग यावर तो जरा हसत म्हणतो कि... हो...पण..मी एक हुशार मेंढी आहे... असं तसं. हरीशच्या म्हणण्या प्रमाणे ट्रिप म्हणजे शांततेत , आरामात आवरणं, घाई करता आणि मग निघावं. माझं त्याच्याशी फार वाजत ह्या गोष्टीवरून. हरीला घरातनं वेळेवर काढणं एक  मोठं काम आहे आणि ह्या वेळी ते सहजच शक्य झालं म्हणजे पहाटे -.३० ला तो तयार पण होता. मग पहाटे .३० ला आम्ही निघालो, पाण्याच्या बाटल्या आणि काही टायिम पास खाण्यासाठी घेऊन बाकी काही नाही
      
एका गाडीचा प्रॉब होता म्हणून सर्वेशला आधीच सांगून ठेवलं होतं कि पहाटे तुझी गाडी घ्यायला येऊ. म्हणजे हरीशची  गाडी तिथे सोडून त्याची गाडी घेणार. त्याप्रमाणे त्याच्या घराकडे निघालो, बिल्डींग  जवळ पण पोहोचलो. पण यार विजय आणि मला दोघानाही ठावूक नव्हतं कि त्याचं घर कोणत्या मजल्यावर आहे आणि कोणतं आहे. कारण त्याने नवीन घर घेतलं आहे आणि मी ते काम चालू असतांना पाहायला आलो होतो. जुनी गोष्ट झाली होती ती आणि आता काही लक्षात नव्हतं. विजयला पण काही आयडिया नव्हती. विनोदला पण तिसऱ्या मजल्या वर आहे (कि नाही...?) एव्हडच माहित होतं सर्वेश फोन पण उचलत नव्हता कारण त्याने रात्रीच धमकी दिली होती कि पहाटे फोन नाही उचलणार.  बस मग काय तिसऱ्या मजल्यावर पोहोचलो पण काही कळेना. विजय दुसऱ्या मजल्या वर पण जाऊन आला पण तरीही काही फायदा झाला नाही. पहाटे .४५ ला  भलत्याच घराची बेल वाजवली तर जो कुणी बाहेर येयील तो त्या बेल प्रमाणेच आम्हाला वाजवेल एव्हड नक्की होतं म्हणून माझी हिम्मत नव्हती होत. काय करावे ह्याच विचारात विजयला एक चप्पल दिसली, तो म्हणाला कि यार सर्वेश अशीच चप्पल घालून येतो कधी कधी (आईशप्पथ ..!!!) चप्पल वरून घर ओळखण्याची हि माझी पहिलीच वेळ. त्याला म्हणालो तूच ठोक दरवाजा दुसऱ्याची चप्पल असेल तर तो हिनेच मारायचा आपल्याला. साहेबांनी हिम्मत केली दोनदा  बेल वाजवली पण काही फायदा झाला नाही. तिसऱ्या वेळी दरवाजा उघडला आणि  सर्वेशच्या वडिलांना पाहून भांड्यात पडलेला जीव परत छातीत आला. स्वभावाने यादव काका फार शांत आहेत (हि गोष्ट फार महत्वाची ठरली ). मग चावी  घेतली आम्ही आणि निघालो. बरोबर वाजता आमची  मुख्य प्रवासाला सुरुवात झाली.                             

सकाळच्या हवेत वेगळीच एनर्जी असते हो. म्हणजे मनात जे काही नकारात्मक विचार असतील (म्हणजे झालेल्या झोपेचे वगैरे वगैरे) ते लगेचच  दूर होतात आणि जी गोष्ट करायला चाललो आहे  त्या बद्दल आनंद वाटायला लागतो. सध्या उन्हाळा चांगलाच  जाणवायला लागला आहे म्हणून वाटलं होतं कि रस्त्यात थंडी अजिबात वाटणार नाही पण यार हा घोटीचा भाग फार थंड जाणवला. तिथे आजू बाजूला - धरणं  आहेत त्यामुळे तिथली हवा चांगलीच थंड होती.  जेथून आम्ही जात होतो तिथला कडक हिवाळा अजून संपलाच नाही असं वाटत होतं. असो

अश्या थंड, आल्हाददायक वातावरणात गाडी बुन्गवत, मस्त गप्पा मारत घोटीला पोहोचलो, डाव्या बाजूला वळलो. घोटीमध्ये थोडं आत घुसताच तुम्हाला जाणवेल कि तुम्ही आता पर्वत रांगांमध्ये घुसले आहात. दिवसातर ते पर्वत आपलं विशाल  रूप दाखवतातच  पण  काळ्या कुट्ट अंधारात सुद्धा ते अंधारापेक्षा काळे होऊन आपलं अस्तित्व दाखवून देतात म्हणजे "हा अंधार सुद्धा आम्हला झाकू शकत नाही" असंच त्यांच्याकडे पाहून वाटतंबराच वेळ थंड अश्या अंधारातून गाडी चालवून एका ठिकाणी थांबलो. नेहमी सूर्याला कुठल्या तरी अपार्टमेंटच्या  मागून उगवतांना बघतो आज पहिल्यांदाच "सह्याद्री" मधला सूर्योदय बघत होतो.       

   

राजूरला पोहोचलो. अगदी वळणावळणाचा रस्ता होता हो, पण बर झाला चांगल्या स्थितीत होता. मधे मधे फार छान असे मनोहारी दृश्य (मस्त शब्द आहे ना हा...!!! :) ) पाहायला भेटत होते ते जसे जमेल तसे टिपत गेलो. आम्ही पुढे होतो म्हणजे विनोद आणि मी. विजय आणि हरी मागे होते. आम्ही पोहोचलो राजूरला पण हे दोघे काही येयीनात आणि फोन पण उचले ना. वाटलं झाला काही तरी गोंधळ....


क्रमशःपुढचा भाग येथे वाचा
2 comments:

  1. Changlich thandi lagali mhanayachi tuzya friendsna................mag kay maja ali na..................

    ReplyDelete
  2. pratikriyebaddal dhanyavad ketaki...!!
    ho yaar pahatechi thandi bhayankar asate...changalach anubhav aala...pan kharach faar majja keli re aamhi..!!!

    ReplyDelete