Thursday, March 22, 2012

'मिशन हरिश्चंद्रगड'

भरपूर दिवस झालेत यार कुठे फिरायला नाही गेलो आहे. कधी पासून मनात होता कि यार बरेच दिवस झालेत असा कोणता तरी गड किल्ला नाही चढलो. शेवटचा गड/किल्ला मला आठवतं कि कळसुबाई वर गेलो होतो मागच्या वर्षी. त्याला पण आता बराच वेळ झाला आहे. सगळे मित्र चांगलेच कामाला लागले आहेत त्यामुळे एकत्र यायला असा वेळ भेटतच नाहीये आणि आणखी एक कारण म्हणजे सुट्ट्याच जुळत नाहीत कुणाच्या. आता ह्या गुढीपाडव्याला ३ दिवस सुट्टी आहे. शनिवारी काही तरी प्लान करावा असं वाटत होतं कारण शुक्रवारी पाडवा, कोण घराबाहेर निघू देणार? त्यातल्या त्यात गड किल्ल्यावर तर नाहीच नाही.

पण जायचं तरी कुठे? असा प्रश्न मनात आला आणि मग 'हरिश्चंद्रगड' ह्या नवा शिवाय दुसरा नाव माझ्या समोर येत नव्हतं. कारण मागच्या वर्षी 'दुर्ग भ्रमण गाथा' हे पुस्तक वाचलं होतं. त्यात गो नि दांडेकर ह्यांनी अगदी छान असं वर्णन केलं आहे ह्या जागेचं. तेव्हा पासून फारशी उत्सुकता लागली आहे हि जागा बघायची. तिथला कोकण कडा, हरीश्च्नद्रेश्वरच मंदिर, तारामती शिखर, सप्ततीर्थ ह्या बद्दल खूप वाचलं आहे. गुगल वर बघा खूप अशी माहिती मिळते आणि भरपूर लोकांनी त्यांच्या ब्लॉग वर पण लिहिलं आहे ह्या बद्दल. तर मग माझ्या मनात नक्की झालं होतं कि ह्या वेळी 'मिशन हरिश्चंद्रगड' फत्ते करावी. सगळ्यांना फोन केला. विजय एका शब्दात तयार. तसाच हरी, विनोद आणि कमलेश सगळेच तयार झालेत. म्हणजे सगळे वाटच पाहत होते वाटतं. विजय तर म्हणतोय कि वर नायीट स्टे करूयात (चांगलाच वैताकलेला दिसतोय डेली रुटीन ला :) ) पण काही अपरिहार्य कारणा मुळे ते आम्हाला जमणार नाहीये :).

म्हणून अशी आशा करतो कि पुढचा ब्लॉग हा माझ्या 'मिशन हरिश्चंद्रगड' ह्या बद्दल असणार. तुमच्या पैकी कुणी जर इथे जाऊन आलेलं असेल आणि जर तिथला थोडा अनुभव शेअर केलात तर नक्कीच आनंद होयील.

1 comment:

  1. हरिश्चंद्रगड ट्रेकिंग साठी खरोखर एक चांगले ठिकाण आहे. मोकळा मनमुक्त वारा आणि दाट वनराजी!

    ReplyDelete